◾ आंबोली बस स्थानक काळोखात; बस स्थानकाच्या दुरुस्तीच्या सूचना हवेत विरल्या..
◾ जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिलेल्या आदेशाला आगार व्यवस्थापकांनी लावल्या वाटण्याच्या अक्षता..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : भाऊ पाटील
🎴 आंबोली, दि-०७:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी आंबोली बस स्थानकातील सर्व गैरसोय त्वरित दूर कराव्यात असा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, मात्र त्या सूचनांना हरताळ फासण्याचे काम परीवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली असल्याची चर्चा आंबोली प्रवाशांमध्ये सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी सावंतवाडी बस स्थानक आगार प्रमुख यांना आंबोली हे राज्याचे पर्यटन स्थळ असल्याने या बस स्थानकाची कोणत्याही प्रकारची हयगय न करता त्वरित डागडुजी करावी ,परिसरात लोंबकळत असलेले पत्रे त्वरित हटवावेत, रंगरंगोटी व विद्युत पुरवठा सुरू करावा, बंद अवस्थेत असलेली बोरवेल पूर्ववत करावी अशा सूचना गेल्या होत्या.
मात्र या सर्व सूचना हरताळ फासण्याचे काम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगार व्यवस्थापक आणि व संबंधित अधिकाऱ्यांनी केले आहे, पावसाचे दिवस जवळ आले तरी आंबोली बस स्थानक काळोखात आहे ,कोणत्याही प्रकारची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाही ,अनेक वेळा सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलने उपोषणे करून सुद्धा अधिकारी जागे होत नसल्याने कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने याबाबत आवाज उठवला होता त्यानंतर त्या ठिकाणच्या डागडुजीला सुरुवात करण्याचे नाटक करण्यात आले मात्र सदरचे काम अद्यापही तसेच आहे, त्यामुळे या परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना प्रवाशांचे सोयरसुतक नसल्याचे बोलले जात आहे .व हे अधिकारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानत नसल्याने आता दाद कोणाकडे मागावी हा प्रश्न प्रवाशां समोर पडला आहे.

