◾ बांदा शहरालगतच्या गावात पोलीसांची जुगार अड्ड्यावर धाड
◾ जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला कारवाई करण्याबाबत दिले होते आदेश..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस
🎴बांदा, दि-०६ -: बांदा शहराच्या नजीकच्या गावात जंगलमय भागात रात्री सुरू असलेल्या बेकायदा जुगारावर बांदा पोलिसांनी अचानक धाड टाकली. मात्र काळोखाचा फायदा घेत जुगार व्यवसायिकांनी जंगलात धूम ठोकली. घटनास्थळी पोलिसांच्या हाती फारसे काही लागले नाही. जुगार खेळण्यासाठी आणलेल्या साहित्याची मात्र पोलिसांनी आग लावून विल्हेवाट लावली. या घटनेची दशक्रोशीत दिवसभर चर्चा होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बांदा दशक्रोशीत रात्रीचे खेळ जोरात सुरू आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रात्रीच्या खेळांवर पोलिसांनी कारवाई करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
शुक्रवारी रात्री बांदा शहरापासून नजीकच असलेल्या गावात संस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या नजीकच जुगार मांडण्यात आला होता. बांदा पोलीसांना याची कुणकुण लागताच पोलीसांनी अचानक धाड टाकली. काळोखाचा फायदा घेत जुगार व्यावसायिक व खेळण्यासाठी आलेल्यांनी जुगाराचे साहित्य तेथेच टाकून कारवाईच्या भीतीने जंगलात धूम ठोकली. पोलिसांनी साहित्याला आग लावत विल्हेवाट लावली. या प्रकरणाची बांदा शहर व पंचक्रोशीत चर्चा सुरू होती.

