आणखीकोकणरत्नागिरीराजकीय

जागतिक महिलादिनी नगरसेविका सई चव्हाण यांचा महिलांसाठी आदर्श उपक्रम

▪️सोमवारी महिलादिनी होणार  शहरातील महिलांसाठी मोफत दुचाकी प्रशिक्षणाचे उदघाटन

▪️नगरसेविका सई चव्हाण, युनिक मोटर्सचा संयुक्त उपक्रम

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण : दि. ०६ नगरपालिका प्रभाग क्रमांक 13 च्या शिवसेनेच्या कार्यतत्पर नगरसेविका माजी महिला बालकल्याण समिती सभापती सौ.सईताई सुयोग चव्हाण यांच्या विशेष संकल्पनेतून महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने सोमवार दि.८ मार्च रोजी महिलादिनी चिपळूण शहरातील महिलांना मोफत दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे,नगरसेविका सई चव्हाण आणि युनिक मोटर्स चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रशिक्षणाचे उदघाटन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोमवार दि. ८ मार्च रोजी सायंकाळी 5 वा. पाग उद्यान शेजारी करण्यात येणार आहे. येथे प्रशिक्षण फक्त महिलांसाठी आहे. या प्रशिक्षणासाठी  महिला प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.हे प्रशिक्षण फक्त चिपळूण शहरातील महिलावर्गासाठी असून प्रवेश मर्यादित आहे. यांचे प्रवेश अर्ज  सोमवारी सायंकाळी पाग उद्यान शेजारी भरून घेण्यात येणार असून इच्छुक महिलांनी आपले आधारकार्ड सहित सदर ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन नगरसेविका सौ. सई सुयोग चव्हाण यांनी केले आहे.नगरसेविका तथा माजी महिला बालकल्याण समिती सभापती सई चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात आपल्या प्रभागातील तसेच शहरातील महिलांच्या हिताची अनेक सामाजिक कामे मार्गी लावली आहेत,तसेच त्या प्रभागतील विकास कामासाठी पालिका प्रशासनाकड़े सतत पाठपुरावा सुरू असतो. महिला दिनी त्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे,तर अनेक महिलांनी सहभाग नोंदविणार असल्याचे सांगितले आहे.

_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥_

_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️

♦संपादक : सीताराम गावडे

📱संपर्क : +919423304856

♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड

📱संपर्क : +919423958828

♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे

📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग_

      अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!