आणखीकोकणरत्नागिरीराजकीय

चिपळुणमध्ये काँग्रेस सेवादलच्या पदाधिकारी नियुक्त्या मोठ्या उत्साहात

▪️काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी सर्वजण एकवटणार असल्याचा ठराव

▪️सौ. नीलम शिंदे, भक्ती कुडाळकर, सौ. सफा गोटे, सौ. स्नेहा आमले, इम्तियाज कडु आदींची निवड

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनीधी : संतोष पिलके

🎴चिपळुण : ०६ येथे आज शनिवार दिनांक ६ मार्च रोजी काँग्रेस सेवादलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अन्वरभाई काद्री, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव सोनललक्ष्मी घाग तसेच चिपळूणचे उपनगराध्यक्ष सुधीरशेठ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस सेवादलच्या पदाधिकाऱ्यांची निवड मोठ्या उत्साहात संपन्न झाली. काँग्रेस सेवादल महिला जिल्हाध्यक्ष म्हणून सौ. नीलम शिंदे, युवती काँग्रेस जिल्हाध्यक्ष भक्ती कुडाळकर, महिला काँग्रेस चिपळूण तालुकाध्यक्ष सौ. सफा गोठे, युवती काँग्रेस चिपळूण तालुकाध्यक्ष स्नेहा आंबले, तर काँग्रेस सेवादल चिपळूण तालुकाध्यक्ष म्हणून इम्तियाज कडू यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी माजी तालुकाध्यक्ष भरतशेठ लबधे,शहराध्यक्ष लियाकतभाई शाह, नगरसेवक कबीर काद्री, करामतभाई मिठागरी, नगरसेविका सफा गोठे, संजीवनी शिगवण व राकेश दाते आदी मान्यवर उपस्थितीत होते.

यावेळी कॉंग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष अन्वरभाई काद्री यांनी चिपळूण आणि जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या वाढीसाठी सेवादल सदैव अग्रेसर राहील अशी ग्वाही दिली. तर सोनललक्ष्मी घाग यांनी महिलांच्या पाठीशी युवक काँग्रेस प्रदेश महासचिव म्हणून आपण नेहमीच पाठीशी राहू. कोणत्याही अडचणी असतील तर पक्षाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचे घाग यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष सुधीरशेठ शिंदे यांनी चिपळूणमध्ये आगामी काळात काँग्रेसला नवसंजीवनी प्राप्त होऊन लवकरच काँग्रेस मोठ्या ताकतीने चिपळूण मध्ये उभे राहिलेले दिसून येईल असा आत्मविश्वास व्यक्त केला. माजी तालुकाध्यक्ष भरत लबधे यांनी चिपळूण मधील आगामी निवडणुकांमध्ये चिपळूण काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी सदैव सोबत राहणार असून काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहतील असे सांगितले.लियाकत शाह यांनीदेखील शहराध्यक्ष म्हणून काँग्रेस एक नंबरला आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी आशकभाई हमदुले, अमर वाडेकर, ओंकार शिंदे, केतन सोलकर, निशांत भोजने आदी उपस्थित होते.

🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live

🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive

🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!