🛑कणकवलीची दिक्षा पुन्हा विजेती !!
*🛑कणकवलीची दिक्षा पुन्हा विजेती !!*
*🛑भिरवंडे, कणकवलीच्या दिक्षा नंदकिशोर चव्हाणने खुली जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकत सर्व कॅरम प्रेमींना सुखद धक्का दिला.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब पुरस्कृत,
सावंतवाडी नगरपरिषद पर्यटन आणि उद्यान सभापती सौ. मोहिनी सुरेंद्र मडगावकर यांच्या संकल्पनेतून, सचिन घाडी मित्रमंडळ सावंतवाडी आयोजित,सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय खुली एकेरी कॅरम स्पर्धा शनिवार, रविवार दि. २ व ३ मे २०२६
काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे संपन्न झाली.
स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी नगरपरिषद सभापती सौ मोहिनी मडगावकर यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी यावेळी महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, सावंतवाडी भाजपा सोशल मीडिया सेलचे केतन आजगावकर, नगरसेविका सुकन्या टोपले, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे शुक्राचार्य महाडेश्वर, योगेश फणसळकर, सचिन घाडी, राजेश निर्गुण इत्यादी उपस्थित होते. यावेळी सर्व स्पर्धकांना भाजपा प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रविंद्रजी चव्हाण पुरस्कृत जिल्हा कॅरम असोसिएशनचा युनिफॉर्म असलेल्या टी शर्टस् चे वाटप करण्यात आले.
जिल्हाभरातून सुमारे 64 स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.
पहिल्या दिवशी प्री क्वार्टर फेरी पर्यंतचे सामने झाले. यामध्ये दिक्षाने सावंतवाडीच्या समीर देऊलकरवर सहज मात केली. तर अनुभवी सचिन घाडीला माणगावच्या नेवीस डान्टसने विजयासाठी झुंजवले. तजमूल मकानदारने मालवणच्या राजू पावसकर व कुडाळच्या अमेय पेडणेकर विरुद्ध झुंज देत उपउपान्त्य फेरी गाठली. कणकवलीच्या डॉक्टर अनिल तायशेटे यांनी मालवणच्या किरण मालवणकरला सहज नमावले. केशर निर्गुण व कुडाळचे अनुभवी खेळाडू शुक्राचार्य महाडेश्वर यांच्यामध्ये तीन सेट पर्यंत लढत होऊन केशर उपउपांत्य फेरीत पोचली. सावंतवाडीचे नवनिर्वाचित सभापती प्रतीक बांदेकर यांनी गौतम यादवला तर सागर ढवळने सावंतवाडीच्या अमूल्य घाडीला हरवून उपउपान्त्य फेरीत प्रवेश केला.
दुसऱ्या दिवशी क्वार्टर फायनलच्या सर्वच लढती अतिशय रोमहर्षक झाल्या. यामध्ये दिक्षा चव्हाणने सचिन घाडीला, तजमुल मकानदारने अनिल तायशेटे यांना, केशर निर्गुणने प्रशांत म्हात्रेला तर सागर ढवळने प्रतिक बांदेकरला हरवून उपांत्य फेरी गाठली.
उपांत्य फेरीमध्ये केशर विरुद्ध सागर ढवळ व दिक्षा विरुद्ध तजमुल मकानदार असे सामने झाले. आणि जिल्ह्यातील कॅरमच्या इतिहासात खुल्या गटाचा अंतिम सामना पहिल्यांदाच दोन महिलांमध्ये झाला. दोघीही महाराष्ट्र राज्याकडून राष्ट्रीय स्पर्धा खेळत असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे ही लढत देखील अतिशय चुरशीची झाली. पहिल्या गेम मध्ये केशरने दिक्षा वर तर दुसऱ्या गेम मध्ये दिक्षा ने केशरवर मात केली. यानंतर अंतिम विजेतेपदासाठी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सेटमध्ये सुरुवातीला दोन बोर्ड नंतर केशरने ९ – ० अशी आघाडी मिळवली. त्यानंतर मात्र दिक्षाने झुंजार खेळ करत विजेतेपद आपल्याकडे खेचून आणले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख व सावंतवाडीचे नगरसेवक सन्माननीय संजू परब व पर्यावरण व उद्यान सभापती मोहिनी मडगावकर यांच्या उपस्थितीत पार पडला. पहिल्या ८ विजेत्यांना रोख रकमेची पारितोषीके व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
मागील सलग तीन स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठून त्यामध्ये दोन विजेतेपदांवर नाव कोरणार्या दिक्षा चव्हाण वर सिंधुदुर्गातील कॅरमप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

