कोकणक्रीडामहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑बाळकृष्ण पेडणेकर वास्को, गोवा येथील राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत “टाॅप टेन”मध्ये!

*🛑बाळकृष्ण पेडणेकर वास्को, गोवा येथील राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत “टाॅप टेन”मध्ये!*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* मार्मागोवा तालुका चेस असोसिएशनने वास्को, गोवा येथे कै.वेंकटेश आणि सुमती शानभाग यांच्या स्मरणार्थ पाचव्या राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टाॅपचा खेळाडू सावंतवाडीचा बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने नववा क्रमांक पटकावला. बाळकृष्णला रोख पारितोषिक, आकर्षक चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. भारतातील विविध राज्यातील सुमारे तीनशे छप्पन खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीचे आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, हर्ष राऊळ, विघ्नेश अंबापूरकर, वेदांत डांगी यांच्यासह दर्श सावंत या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला.

या स्पर्धेत बाळकृष्णने नऊ राऊंड्समध्ये सहा राऊंड्स जिंकून आणि दोन राऊंड्स बरोबरीत सोडवून सात गुण केले आणि नववा क्रमांक मिळवला. बाळकृष्णने आपल्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये बारा गुणांची वाढ केली. तेरा वर्षीय हर्ष राऊळ याने चमकदार कामगिरी करत पाच राऊंड्स जिंकून आणि एक राऊंड बरोबरीत सोडवून साडेपाच गुण केले. आठ वर्षीय विघ्नेश अंबापूरकर याने चांगला खेळ करुन तीन राऊंड्स जिंकून आणि तीन राऊंड्स बरोबरीत सोडवून साडेचार गुण केले. बारा वर्षीय वेदांत डांगी याने तीन राऊंड्स जिंकून आणि एक राऊंड बरोबरीत सोडवून साडेतीन गुण केले. दर्श सावंत याने राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग घेऊन चार राऊंड्स जिंकून चार गुणांची कमाई केली. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विदयार्थ्यांनी हे यश मिळवले. ॲकेडमीच्या उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर यांनी सर्व विदयार्थ्यांचे कौतुक करतानाच सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व स्तरातून विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!