कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ ओटवणे घाटी ते ओटवणे रवळनाथ मंदिर कडील रस्ता तात्काळ दुरुस्त करावा; बाबू सावंत

 

◾ पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांची बांधकाम विभागाकडे मागणी

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी दि.०६-: ओटवणे घाटी ते ओटवणे रवळनाथ मंदिर कडील रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबु सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे . याबाबतचे निवेदन कार्यकारी उपअभियंता अनिल आवटी यांच्याकडे त्यांनी दिले आहे.

ओटवणे गावात जाणार्या माजगाव नाला ते ओटवणे रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला होता मात्र घाटीपर्यत अर्धा रस्त्याचे काम मार्गी लागले आहे, मात्र उर्वरीत रस्त्याचे काम मंजुर असुनही ते करण्यात बांधकाम विभाग चालधकलपणा करत आहे, या रस्त्यावर मोठी रहदारी असते त्यामुळे या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यात यावे अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे, दरम्यान येत्या महिन्याभरात रस्त्याचे काम हाती घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी आवटी यांनी श्री सावंत याना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!