ग्राहकांची वीज कनेक्शन तोडलीत तर मनसे करणार आंदोलन : गणेश भोंदे
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : ओकार रेळेकर
🎴चिपळूण : दि. ०६ ग्राहकांची वीज कनेक्शन तोडलीत तर मनसे करणार आंदोलन, असा इशारा मनसे शहर अध्यक्ष गणेश भोंदे यांनी महावितरण कार्यलयाला दिला आहे. करोनाच्या काळात माणसावर उपासमारीची वेळ आली असता, कित्येक माणसंच्या नोकऱ्या गेल्या. ज्यांना कोरोना झाला, त्यांनी लाखो रुपये कर्ज काढून, दागिने गाहाण ठेवून ईलाज केला. माणसे पुरत: कर्जबाजरी झाली आहेत. त्यात आपणाकडून दमदाटी करून बिले वसुल केली जात आहेत.
त्या माणसांना नाहक त्रास होत आहे, सर्वांना आपली बिले भरायची आहेत. तरी ती बिले दोन ते तीन टप्यात भरण्यास आपणाकडून परवानगी दयावी. असे आवाहन शहराचे शहर अध्यक्ष गणेश भोंदे यांनि केले आहे.
हे लेटर देताना शहर अध्यक्ष गणेश भोंदे, खेड तालुका अध्यक्ष नाना चळके महिला शहर अध्यक्ष सौ. वृषाली ताई सावंत, विभाग अध्यक्ष परेश घोरपडे, विकास निवाते, दिनेश राणे, उदय जोशी, राजेंद्र गोंजारी, माजी शहर कार्यध्यक्ष शुभम पिंपळकर, कल्पेश ओंबाळकर, गौराव घोसाळकर हे सर्वजण उपस्थित होते.
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला