आणखीकृषिकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

निगुडेत विकेल ते पिकेल अभियान…

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा : दि. ०५ भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोचवा यासाठी यासाठी ‘पिकेल ते विकेल’ या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून सहाय्य करण्यात आले. इन्सुली खामदेव नाका या ठिकाणी निगुडे येथील शेतकरी शर्मिला शांताराम नाईक व अरूण वासू शेगडे या दोन शेतकऱ्यांना दुकान लावण्यासाठी सहकार्य करण्यात आले.

ज़िल्हा कृषी अधीक्षक म्हेत्रे, आत्माकृषी अधिकारी घोलप, उपविभागीय कृषिअधिकारी अजित अडसुळे, तालुका कृषिअधिकारी माधुरी मुटके, मंडळ कृषिअधिकारी पापडे यांच्या उपस्थितीत सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बचत गटाचा भाजीपाला स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरूदास गवंडे, शेर्ले सरपंच उदय धुरी, तसेच सागर निगुडकर व शेतकरी आदी उपस्थित होते.

संत शिरोमणी सावतामाळी अभियानात शेर्ले कृषी सहायक्क एस.ए.बेळगुंदकर यांनी शेतकरी निवडून त्यांची शेतकरी गटांकडून भाजी विक्री व्हावी यासाठी गट तयार केले. तसेच शेतकरी विक्रेता यांना भाजी दुकान लावण्यासाठी प्रोत्साहन दिले.

💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥

💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!