वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : शैलेश शेळके
🎴वैभववाडी : दि. ०३ ग्रामीण भागातील युवक शेतीकडे वळतोय, ही समाधानाची बाब आहे. शेतकरी सक्षम करणे, हे खरेदी-विक्री संघाचे मुळ उद्दिष्ट आहे. भात पिकाबाबत गावागावात सुरू असलेला गैरसमज थांबवला पाहिजे. भात पिके शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पीक आहे. तालुक्यातील सिंचन प्रकल्प पुर्णत्वास गेल्यास भात पिकाचे दुबार पीक घेणे हे सहज शक्य आहे. असे प्रतिपादन वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन महेश संसारे यांनी व्यक्त केले.
वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा बँकेच्या सभागृहात पार पडली. यावेळी व्हा. चेअरमन प्रमोद रावराणे, संचालक अंबाजी हुंबे, संजय रावराणे, रवींद्र पवार, अनंत फोंडके, आरती रावराणे, सचिव सिद्धेश रावराणे व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीला तालुक्यातील आदर्श शेतकऱ्यांची निवड करून त्यांना पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार प्राप्त शेतकरी पुढील प्रमाणे – नाधवडे येथील राजेश परशुराम तावडे यांना उत्कृष्ट भात पीक शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिगशी येथील स्वप्नील चंद्रकांत धुरी यांना आदर्श ऊस पीक उत्पादक शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नावळे येथील आत्माराम धोंडू गुरव यांना उत्कृष्ट काजू पीक शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नाधवडे येथील रमाकांत बाळाराम यादव यांना प्रयोगशील शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. करूळ येथील सचिन सुभाष पाटील यांना आदर्श पशुपालक शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. खांबाळे येथील मंगेश परशुराम कदम यांना उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या सर्व पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा या सभेत गौरव करण्यात आला. त्यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देण्यात आले.
तसेच तालुक्यात भात खरेदी करण्यासाठी भरीव योगदान देणारे वाभवे येथील दत्ताराम शिवराम कदम, दिलीप विठोबा सावंत, अजय तळेकर, शशिकांत लांजवळ यांचाही संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी महेश संसारे म्हणाले, पुरस्कार प्राप्त शेतकर्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेऊन शेतीत प्रगती साधली पाहिजे. यावेळी सभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली. आभार सिद्धेश रावराणे यांनी मानले.
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

