टोचलं तरी सत्यच!” – नितेश राणे यांचा परखड गौरव; कोकण लाईव्ह ‘हक्काचं’ चॅनेल घोषित
टोचलं तरी सत्यच!” – नितेश राणे यांचा परखड गौरव; कोकण लाईव्ह ‘हक्काचं’ चॅनल घोषित
सिंधुदुर्गात वर्धापन दिन सोहळ्यात राजकीय दिग्गजांची उपस्थिती; दीपक केसरकर यांचाही गावडे यांच्या लेखनशैलीला सलाम
सावंतवाडी| प्रतिनिधी :
“समाजाला दिशा देणारे, टोचले तरी सत्य मांडणारे लोक दुर्मिळ होत चालले आहेत… अशा माणसांना जपलं पाहिजे!” — या थेट आणि ठाम शब्दांत पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सिताराम गावडे यांच्या परखड पत्रकारितेचा गौरव केला.कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य सोहळा शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी नगराध्यक्ष बबन सागावकर, युवराज लखन राजे भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे,माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी,माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत,जि,प, सदस्य विक्रांत सावंत, पंचायत समिती सदस्या सौ उत्कर्षा गावकर, कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल संचालिका सौ संयुक्ता गावडे, मुख्य संपादक सीताराम गावडे जेष्ठ नेते संदिप कुडतरकर, तहसीलदार श्रीधर पाटील,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“*निमंत्रणाची गरज नाही, हक्काने येतो!” – राणे*
राणे कुटुंब आणि सिताराम गावडे यांचं अतूट नातं अधोरेखित करत पालकमंत्री राणे म्हणाले,
“या कार्यक्रमाला यायला आम्हाला निमंत्रणाची गरज नाही. हा आमचा हक्काचा मंच आहे. कोकण लाईव्ह हे आमचं हक्काचं चॅनेल आहे!”
त्यांनी पुढे गावडे यांच्या लिखाणाचा उल्लेख करत सांगितले की,
“त्यांचं लिखाण कधी टोचतं, कधी विचार करायला भाग पाडतं… पण ते नेहमी सत्याशी जोडलेलं असतं. आम्हीही कधी त्यांच्या लेखामुळे संभ्रमात पडतो, पण त्यांचा खुलासा ऐकला की समाधान मिळतं.”
*“परखडपणा विकत मिळत नाही!*”
राणे यांनी गावडे यांच्या व्यक्तिमत्त्वावर थेट भाष्य करत म्हटलं,“अशा प्रकारचा परखडपणा बाजारात विकत मिळत नाही. सीताराम गावडे हे वेगळे रसायन आहे फायदा-तोटा न पाहता सत्य मांडणं ही त्यांची ताकद आहे.”
यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत जाहीर केलं की,“राणे कुटुंबीय म्हणून आम्ही सिताराम गावडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत!”
*“लोकप्रियतेचा कळस!” – केसरकर*
यावेळी आमदार दीपक केसरकर यांनीही गावडे यांच्या कामाचं कौतुक करत सांगितलं,“त्यांचं वास्तववादी लिखाणच त्यांच्या लोकप्रियतेचं गमक आहे. सभागृहातली गर्दीच त्याचा पुरावा आहे.”
“गौरव सोहळ्यात उद्योजकांचा सन्मान*
कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शैलेश पई, राजेश पंतवालावलकर,हरी वारंग , गोविंद मळगावकर,रुपेश सावंत,दिलीप सावंत,यांचा यशस्वी उद्योजक तर वैद्यकीय क्षेत्रातील देवदूत डॉ प्रविण मसुरकर, समाजाभिमुख पत्रकार शिवप्रसाद देसाई, उत्कृष्ट कवी द,मी,गवस गुरूजी, उत्कृष्ट खेळाडू कबीर हेरेकर, उत्कृष्ट हार्मोनियम वादक बाबल गावकर, तसेच विविध क्षेत्रातील क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा “यशस्वी उद्योजक” म्हणून सत्कार करण्यात आला.कोकणात बेधडक, रोखठोक आणि वास्तववादी पत्रकारितेचा आवाज म्हणून कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला…
आणि या आवाजामागे उभा असलेला “परखडपणा” — आज राजकारणालाही मान्य करावा लागला!

