◾ दोडामार्ग तालुक्यातील सुरू असलेल्या बेकायदेशीर काळ्या दगडाच्या खाणी व बेकायदेशीर चिरेखाणी नक्की कोणाच्या आशिर्वादाने; दोडामार्ग वासियांना प्रश्न
◾ या मुळे जिवघेणे प्रकार घडताहेत, त्यामुळे या विषयाची कसून चौकशी करावी; ग्रामस्थांची मागणी
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी:प्रतिक राणे
🎴ठिकाण: दोडामार्ग
🎴दोडामार्ग, दि,३:- दोडामार्ग तालुक्यात शिरंगे येथील धरणाच्या लगत असलेले शासनाच्या नियमाचे उल्लंघन करत सुरू असलेल्या बेकायदेशीर काळ्या दगडाच्या खाणी, तसेच काही महिन्यांपूर्वी साटेली-भेडशीत सुरू असलेल्या शासनाच्या जमीनीवर बेकायदेशीर चिरेखाणी उत्खनन नक्की कोणाच्या आशिर्वादाने सुरू होते व या सर्व बेकायदेशीर खाणींचे मुख्य म्होरके कोण असे प्रश्न दोडामार्ग वासियांच्या मनात उद्भवतात. तालुक्यात असे जिवघेणे प्रकार घडताहेत त्यामुळे याची कसून चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
काही महिन्यांपूर्वी दोडामार्ग तालुक्यातील माटणे गावात असलेल्या बेकायदेशीर खाणींमध्ये पाणी साचून दोन चिमुकल्या मुलांनचा त्यात बुडन मृत्यू झाला होता. तरी देखील बेकायदेशीर उत्खननांना आळा बसला नाही.
रविवारी झालेल्या जिलेटीन स्फोटात दोन परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणावर जखमी झाले होते. हे कामगार शिरंगे येथील काळ्या दगडाच्या खाणीत काम करत होते. परंतु ते जखमी अवस्थेत मात्र मणेरी मध्ये मुख्य रस्त्याच्या बाजूला आढळले व ते शिरंगे येथे काम करत असल्याचे उघडकीस आले त्यांची सखोल चौकशी करण्यासाठी दोडामार्ग पोलीसांनी शिरंगे येथे काळ्या दगडांच्या खाणीच्या ठिकाणी कसून चौकशी केली. मात्र नातेवाईक व कामगारांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केल्याची दिसून आली. मात्र पोलीस या विषयाची कसून चौकशी करत आहेत.

