◾ सावंतवाडी तालुक्यात शेतीबागायतीची नासधूस करणाऱ्या गवा रेड्याचा बंदोबस्त करा
◾ शिवसेना शिष्टमंडळाची वनविभागाकडे मागणी
🖥️ Kokan Live Braking News
✍️प्रतिनिधी: प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि.०३:- तालुक्यात अनेक गावांमध्ये गवा रेड्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे.यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांनी कष्ट करुन केलेली शेती,बागायती गवे रेडे येऊन अगदी क्षणभरात नासधूस करत आहे यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे माजगांव चिपटेवाडी व अन्य परिसरात गव्यारेड्यांनी केलेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थीक सहाय्य मिळवून द्यावी अशा मागणीचे निवेदन आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने वनविभागाला दिले आहे.

