कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सैनिक सैनिक स्कूल आंबोली येथे साहसी व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांतर्गत इतिहास साधने व प्रदर्शन.

*🛑सैनिक सैनिक स्कूल आंबोली येथे साहसी व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांतर्गत इतिहास साधने व प्रदर्शन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २१:-*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सैनिक स्कूल आंबोलीच्यावतीने १८ एप्रिल ते ०१ मे या कालावधीत साहसी व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या अनुषंगाने आज, रविवार दि. २० एप्रिल रोजी दुपारी ३.०० वाजता इतिहासाची साधने व प्रदर्शन हा विशेष कार्यक्रम पार पडला.

हा कार्यक्रम दुर्ग रक्षक प्रतिष्ठान, दुर्ग मावळा प्रतिष्ठान तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात इतिहास अभ्यासक श्री. ज्ञानेश्वर राणे यांनी विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिहासाची ओळख करून देत गड–कोट व दुर्गसंवर्धनाचे महत्त्व सविस्तरपणे स्पष्ट केले. यावेळी अफजलखान वध हा ऐतिहासिक प्रसंग विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष शस्त्र हाताळणीद्वारे सादर करून घेण्यात आला, ज्यामुळे इतिहासाचा अनुभव विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे घेता आला.

प्रदर्शनामध्ये ऐतिहासिक भौतिक साधने, लिखित साधने, तसेच शस्त्रे व आरमारी जहाजांची छायाचित्रे मांडण्यात आली होती. शस्त्रसामग्रीमध्ये मराठा धोप, मराठा गुर्ज, वाघनखे, कट्यार, दांडपट्टा, खंडा तलवार, ढाल, जिरेटोप आदी विविध ऐतिहासिक शस्त्रांचा समावेश होता.

या कार्यक्रमास दुर्ग रक्षक प्रतिष्ठानचे सदस्य राजाराम (आबा) चिपकर, एज्युकेशन इन्स्ट्रक्टर सुभेदार शिवराज पवार, ऑनररी कॅप्टन जयराम कोळी, ज्येष्ठ शिक्षक एस. के. गावडे, कॅम्प कमांडर दत्ता बावधने, शिक्षक परमेश्वर सावळे, हंबीरराव अडकुरकर, एस. एन. पोद्दार, आर. पी. माने, संतोष राऊळ, उदय घारे, कोच सतीश अहिर, डी कर्नल अकॅडमी फॉर अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅण्ड एअरोस्पोर्ट्सचे प्रशिक्षणार्थी, सैनिक स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कॅम्प कमांडर दत्ता बावधने यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर शिक्षक एस. के. गावडे यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम व संस्थेच्या उपक्रमास प्राचार्य एन. डी. गावडे यांनी शुभेच्छा दिल्या. शेवटी एस. के. गावडे यांनी आभार प्रदर्शन केले.

दरम्यान, डी कर्नल अकॅडमी फॉर अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅण्ड स्पोर्ट्स तर्फे २५ एप्रिल ते ०१ मे या कालावधीत शिबिराच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिराचा लाभ सर्व विद्यार्थी मित्रांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनील राऊळ व प्राचार्य एन. डी. गावडे यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!