🛑शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चाललेल्या काळ्याबाजाराचा प्रसाद गावडेंकडून “पर्दापाश”
*🛑शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चाललेल्या काळ्याबाजाराचा प्रसाद गावडेंकडून “पर्दापाश”*
*🛑”एनी डेस्क” सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे ठेकेदारच चालवतात टेंडरचा कारभार*…!
*🛑अधिष्ठातांच्या बेजबाबदार कारभाराविरोधात “डीन हटाव- हॉस्पिटल बचाव” जन आंदोलन पुकारणार असल्याचा दिला इशारा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- १८:-* जिल्हा वासियांच्या आरोग्य सेवेची यंत्रणा सक्षमपणे हाकणे अपेक्षित असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील काळ्या बाजाराचा कागदपत्रांनीशी पर्दापाश आज सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडेंनी ओरोस मुख्यालय येथील आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे. पुणे, सांगली व कोल्हापूर येथील पुरवठादार ठेकेदारच सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज व रुग्णालयाचा प्रशासकीय कारभार चालवत असून कोटींच्या निविदांना प्रसिद्धी देणे,मंजुरी देणे, स्वतःच स्वतःला पात्र ठरवून इतरांना अपात्र करणे असा “भ्रष्ट” कारभार “एनी डेक्स सॉफ्टवेअर” प्रणालीच्या माध्यमातून चालवत असल्याचा आरोप श्री.गावडे यांनी करत पुरावे सादर केले. काही महिन्यांपूर्वी मेडिकल साहित्य खरेदी प्रक्रियेत 62 लाखांच्या निविदाकाराला डावलून 99 लाख रुपयांची निविदा भरणाऱ्या मर्जीतील निविदाकाराला मंजुरी देणाऱ्या टोळीचे कारनामे कागदपत्रांसहित उघड केले असून जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी याकडे आतातरी डोळसपणे पाहण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पत्राचा व प्रकरणाशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या खुलाशांचा हवाला देत भ्रष्टाचाराचा काळाबाजार नेमका कसा चालतो याचा पाढाच आज पत्रकार परिषदेतून मांडला. भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणा अक्षरशः खिळखिळी केली असून “डीन”च टोळीचा प्रमुख असल्याचा सणसणाटी आरोप देखील त्यांनी पत्राचा आधार घेत केला आहे. वस्त्रधुलाई टेंडर, साहित्य खरेदी, आहार पूरवठा, पुस्तक खरेदी अशा अनेक प्रकरणातील कारनामे ” एनी डेस्क प्रणालीच्या माध्यमातून ” घडवले गेल्याचे उघड केले असून यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री,वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव व आयुक्त यांचेकडे रितसर तक्रारी देत अधिष्ठाता व संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केल्याचे सांगितले. मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मधील 90% कर्मचाऱ्यांच्या डीन विरोधात तक्रारी असून देखील त्यावर वेळीच कार्यवाही झाली असती तरं आज जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अशी अधोगतीस गेली नसती, डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने रुग्णांना इतरत्र रेफर करावे लागते, रेफर सेंटर म्हणून शिक्का बसल्याने आता लाजेपोटी पेशंट “डिस्चार्ज” भासवत वेळ मारून नेली जात आहे. यावर डेनने खुलासा देताना पेशंटच्या अशा कोणत्याही तक्रारी नाहीत असा आश्चर्यकारक खुलासा सादर करणे म्हणजे आपत्कालीन काळात पेशंटला आरोग्यसेवा चांगली कशी देता येईल व या परिस्थितीतून कसे बाहेर पडता येईल असा विचार करणाऱ्या पेशंटच्या नातेवाईकांनी पेशंट बाजूला ठेवून डीनकडे तक्रारी कराव्यात व त्यातच वेळ घालवावा अशी डीनची अपेक्षा आहे का असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. ढासळलेली आरोग्य यंत्रणा व सर्वसामान्य जनतेच्या होणारी गैरसोय पाहता वेळप्रसंगी 1 मे नंतर “डीन हटाव…हॉस्पिटल बचाव” असे नागरी जनआंदोलन पुकारणार असल्याचा इशारा देखील सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते प्रसाद गावडे यांनी पत्रकार परिषदेतून जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

