कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑डिजिटल पत्रकारांचा महामेळावा गोव्यात; ४ मे रोजी पणजीत राष्ट्रीय अधिवेशन- सीताराम गावडे

*🛑डिजिटल पत्रकारांचा महामेळावा गोव्यात; ४ मे रोजी पणजीत राष्ट्रीय अधिवेशन- सीताराम गावडे*

 

*🛑महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत राहणार उपस्थित.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ११:-* डिजिटल आणि प्रिंट मीडियातील पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या ४ मे रोजी गोवा राज्यातील पणजी येथील ऐतिहासिक कला अकादमी येथे भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात येणाऱ्या या अधिवेशनाकडे देशभरातील पत्रकारांचे लक्ष लागले आहे.या अधिवेशनाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह गोवा व केंद्रातील विविध मान्यवर मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ संपादक तथा राज्य संघटक सीताराम गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकारांच्या न्याय हक्कांपासून ते त्यांच्या समस्या, आव्हाने आणि उपाययोजना या विषयांवर या अधिवेशनात सखोल विचारमंथन होणार आहे. सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया या दोन्ही क्षेत्रातील हजारो पत्रकार या अधिवेशनात सहभागी होणार असून, हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना गावडे म्हणाले, “पत्रकारांच्या हक्कांसाठी अनेक संघटना काम करत असल्या तरी अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही वेगळ्या पातळीवर काम करत आहे. मागील काही वर्षांत याचा अनुभव आम्हाला आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटना अधिक बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

दरम्यान, सावंतवाडी तालुक्याची नवनिर्वाचित कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली. डिजिटल युगातील अभ्यासू व सक्रिय युवा पत्रकार सिद्धेश सावंत यांची तालुकाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सचिवपदी सिद्धेश पुरलकर, उपाध्यक्षपदी विशाल पित्रे, संघटकपदी प्रशांत मोरजकर, खजिनदारपदी भिकाजी उर्फ नाना धोंड तर प्रसिद्धी प्रमुखपदी साबाजी परब यांची निवड करण्यात आली.

तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून त्रिविक्रम सावंत यांची निवड झाली असून सदस्यपदी शुभम सावंत, श्रीरंग सावंत, संदीप राऊळ, आशिष धोंड, धनराज सगम यांच्यासह अनेक युवा पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

या पत्रकार परिषदेला राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, कोकण संघटक राजेश नाईक, जिल्हा संघटक आनंद धोंड, तसेच अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन आनंद धोंड यांनी केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!