पुणेमहाराष्ट्र

🛑 पुणे बुधवार पेठेत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांवर कारवाई; शहरभर पोलिसांची धडक मोहीम, विविध गुन्ह्यांवर कडक कारवाई.

*🛑 पुणे बुधवार पेठेत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांवर कारवाई; शहरभर पोलिसांची धडक मोहीम, विविध गुन्ह्यांवर कडक कारवाई.*

 

*🛑पोलीस उपआयुक्त कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴पुणे, दि- ११:-* शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळत आहे. बुधवार पेठ परिसरात संशयास्पदरीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. तपासात त्या बेकायदेशीररीत्या भारतात राहत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना शासनाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तातडीने देशाबाहेर पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या महिलांकडे आधार कार्ड आढळून आले असून ती कशी मिळवण्यात आली याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणामुळे बनावट कागदपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, पुणे शहर पोलिसांकडून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. दि. १० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत परिमंडळ-१ कार्यक्षेत्रातील

फरासखाना, समर्थ, खडक, विश्रामबाग, डेक्कन आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. मोकळ्या जागा, ब्लॅक स्पॉट्स आणि सार्वजनिक ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करून अवैध प्रकार व सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या घटनांना आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या मोहिमेत एकूण ४२ ठिकाणांची तपासणी करण्यात आली असून विविध कायद्यांनुसार मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. भा.न्या.सं. कलम २८५ अंतर्गत ३ गुन्हे नोंदविण्यात आले, कोटपा कायद्याअंतर्गत १२ खटले दाखल करण्यात आले, ट्रिपल सीट वाहनचालकांवर ३१ कारवाया करण्यात आल्या. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत २२ खटले, एनडीपीएस कायद्यांतर्गत २ गुन्हे आणि महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत ४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. परिमंडळ-१ मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी आणि पोलिस अंमलदारांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

शहरात अंमली पदार्थ, बेकायदेशीर दारू, तंबाखू विक्री आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांची ही धडक मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!