कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सह्याद्री उद्ध्वस्त, आणि नेते गप्प? — वायंगणी कासव महोत्सवातून आमदारांना थेट सवाल.

*🛑सह्याद्री उद्ध्वस्त, आणि नेते गप्प? — वायंगणी कासव महोत्सवातून आमदारांना थेट सवाल.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ११:-* वायंगणी येथे आयोजित कासव महोत्सवात (ऑलिव्ह रिडले) बोलताना सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दिपक केसरकर यांनी “कासव महोत्सव ही केवळ पर्यटन नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाची चळवळ आहे,” असे गौरवोद्गार काढले. त्यांच्या या वक्तव्याचे सर्व स्तरांतून स्वागत होत असतानाच, सह्याद्रीतील

पर्यावरणाच्या प्रश्नावर मात्र तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी आमदार केसरकर यांच्यावर थेट निशाणा साधत खडेबोल सुनावले आहेत.

“समुद्रातील जैवविविधतेचे संवर्धन महत्त्वाचेच आहे, याबाबत दुमत नाही. मात्र, मग सह्याद्रीतील जैवविविधतेचे काय?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सह्याद्री हा जागतिक पातळीवरील जैवविविधतेचा ‘हॉटस्पॉट’ मानला जातो. येथे किंग कोब्रा, पट्टेरी वाघ, गवे, हत्ती, बिबट्या यांसारखी दुर्मिळ वन्यजीवसंपदा, तसेच असंख्य वनस्पती, वृक्ष, किटक आणि फुलपाखरांची समृद्ध विविधता आढळते. मात्र सध्या या निसर्गसंपदेवरच मोठे संकट ओढवले आहे.“लाखो वृक्षांची बेसुमार तोड आधीच सुरू आहे आणि प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार आहे. अशा वेळी पर्यावरण संवर्धनाचे गोड बोल करणारे आमदार या गंभीर विषयावर मुग गिळून गप्प का?” असा थेट सवाल डॉ. परुळेकर यांनी केला.

ते पुढे म्हणाले, “अडीच हजार वर्षांमध्ये घडलेला हा निसर्ग काही वर्षांत उद्ध्वस्त करून आपण नेमका कोणता विकास साधणार आहोत? हा विकास निसर्गाच्या किमतीवर असेल, तर तो विकास नव्हे, तर विनाशच ठरेल.”कासव महोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या आमदारांनी सह्याद्रीतील पर्यावरणीय संकटावरही स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.दरम्यान, या टीकेला आमदार दिपक केसरकर काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!