🛑सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणीवर अनिल भिसे बिनविरोध.
*🛑सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणीवर अनिल भिसे बिनविरोध.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची विशेष सर्वसाधारण सभा आज ‘पर्णकुटी’ शासकीय विश्रामगृह येथे उत्साहात पार पडली. या सभेत सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीवर तालुका प्रतिनिधी निवडण्याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल भिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा कार्यकारिणीचे तत्कालीन सहसचिव तथा सदस्य कै. प्रवीण मांजरेकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने अनिल भिसे यांच्या नावास संमती दर्शवत त्यांची निवड निश्चित केली.
निवडीनंतर पत्रकार संघाच्या वतीने अनिल भिसे यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय देसाई, उमेश सावंत, विनायक गांवस, हरिश्चंद्र पवार, मंगल नाईक-जोशी, अमोल टेंबकर, ॲड. संतोष सावंत, अभिमन्यू लोंढे आदींनी मनोगत व्यक्त करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तालुकाध्यक्ष सचिन रेडकर म्हणाले की, कै. प्रवीण मांजरेकर यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून न येणारी आहे. मात्र, त्यांचे सहकारी असलेले अनिल भिसे हे त्यांचे कार्य सक्षमपणे पुढे नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तालुका पत्रकार संघाची भक्कम साथ त्यांना सदैव राहील,असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीस जिल्हा कार्यकारिणीचे खजिनदार ॲड. संतोष सावंत, तालुका सचिव विजय राऊत, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सहसचिव विनायक गांवस, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सागर चव्हाण, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, माजी तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार, विजय देसाई, उमेश सावंत, काका भिसे, दीपक गांवकर, रूपेश हिराप, जतिन भिसे, प्रसन्न राणे, मंगल नाईक-जोशी, अनुजा कुडतरकर, भुवन नाईक, प्रणव तारी आदी उपस्थित होते.
दरम्यान,सिंधुदुर्ग प्रेस क्लबचे अध्यक्ष अनंत जाधव यांनीही अनिल भिसे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

