कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आंबोली,गेळे, चौकुळमध्ये सौर दिवे व बॅटरी संच पुरवण्याची मागणी.

*🛑आंबोली,गेळे, चौकुळमध्ये सौर दिवे व बॅटरी संच पुरवण्याची मागणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या आंबोली, गेळे आणि चौकुळ या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी तातडीने सौर दिवे व बॅटरी संच उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पंचायत समिती सदस्य मायाकल डिसोजा यांनी वनविभागाकडे केली आहे.

या भागात घनदाट जंगल असून रानगवे, अस्वल, बिबट्या आणि हत्ती यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकरी तसेच ग्रामस्थांना विशेषतः रात्रीच्या वेळी जीविताचा धोका निर्माण होत आहे. शेतात जाणे किंवा दैनंदिन कामांसाठी बाहेर पडणे कठीण बनले आहे.

याबाबत उपवनसंरक्षक मिलिंद शर्मा यांना निवेदन देण्यात आले असून, या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे. आंबोली, गेळे आणि चौकुळ ही गावे पूर्णपणे जंगल परिसरात असल्याने येथे वन्यप्राण्यांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सतत भीतीचे वातावरण आहे.

याशिवाय,या भागात अतिवृष्टी व धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने वन्यप्राणी सहजपणे दिसत नाहीत. परिणामी अचानक हल्ल्याचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि सुरक्षित वावरासाठी सौर दिवे व बॅटरी संच अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.

त्यामुळे वनविभागाने या तिन्ही गावांमध्ये लवकरात लवकर सौर दिवे व बॅटरी संच पुरवून ग्रामस्थांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे,अशी मागणी डिसोजा यांनी केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!