🛑दोडामार्गची कन्या सई धर्णेचा राष्ट्रीय झंकार.
*🛑दोडामार्गची कन्या सई धर्णेचा राष्ट्रीय झंकार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- ०८:-* तालुक्यातील साटेली-भेडशी येथील सई मारुती हिने पदवीधर फार्मसी एप्टीट्यूड टेस्ट (GPAT) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत देशात २५ वा क्रमांक पटकावत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) मार्फत घेण्यात आलेल्या या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत देशभरातून सुमारे ५३,६१७ उमेदवार सहभागी झाले होते. अशा कठीण स्पर्धेत सईने आपल्या जिद्दी, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर अव्वल स्थान मिळवून दोडामार्ग तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे.
सईची शैक्षणिक वाटचालही तितकीच उल्लेखनीय राहिली आहे. तिने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण करुणा सदन इंग्लिश मीडियम स्कूल साटेली – भेडशी येथे पूर्ण केले, तर बारावीचे शिक्षण आमदार दीपकभाई केसरकर सायन्स कॉलेज, दोडामार्ग येथे घेतले. त्यानंतर सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमधून बी.फार्म (B. Pharm) पदवी संपादन करत तिने आपल्या शैक्षणिक प्रगतीची भक्कम पायाभरणी केली.
GPAT परीक्षेतील या घवघवीत यशामुळे सई आता देशातील फार्मसी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च संस्थांपैकी एक असलेल्या ‘नायपर’ (National Institute of Pharmaceutical Education and Research – NIPER) मध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास पात्र ठरली आहे. फार्मसी क्षेत्रात संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी NIPER ही अत्यंत प्रतिष्ठित संस्था मानली जाते, त्यामुळे सईसाठी हे यश मोठ्या संधीचे दार उघडणारे ठरले आहे.
सईच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दोडामार्ग तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळत आहे. मेहनत, चिकाटी आणि ध्येयवेड याच्या बळावर कोणतेही यश गाठता येते, याचे सई धर्णे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

