🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला चार वर्षांनंतर मिळाला कायमस्वरूपी फिजिशियन; डॉ. विशाल शेट्टी रुजू.
*🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला चार वर्षांनंतर मिळाला कायमस्वरूपी फिजिशियन; डॉ. विशाल शेट्टी रुजू.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची गेल्या चार वर्षांपासूनची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. रुग्णालयात फिजिशियन म्हणून डॉ. विशाल नंदकुमार शेट्टी यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. या नियुक्तीमुळे सावंतवाडीसह परिसरातील हृदयविकार आणि गंभीर रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
डॉ. विशाल शेट्टी यांचे स्वागत सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे उपस्थित होते. डॉ. शेट्टी यांच्या नियुक्तीमुळे रुग्णालयातील महत्त्वाचा अनुशेष भरून निघाला आहे.
डॉ. अभिजीत चितारी यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त होते. यासाठी अनेक स्तरांवरून प्रयत्न झाले होते:
सामाजिक पाठपुरावा: रुग्ण कल्याण समिती, सावंतवाडी नागरिक कृती समिती आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांनी सातत्याने या मागणीचा पाठपुरावा केला होता.
न्यायालयीन लढा: या नियुक्तीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आली होती.
राजकीय प्रयत्न: सिंधुदुर्ग चे सुपुत्र तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण,पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही नियुक्ती यशस्वी झाली आहे.
माजी पालकमंत्र्यांचे योगदान
मध्ये काही काळ फिजिशियन नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. त्यावेळी माजी पालकमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्वखर्चातून खाजगी फिजिशियनची नियुक्ती केली होती. सुमारे चार महिने त्यांनी ही सेवा सुरू ठेवून रुग्णांना आधार दिला होता. या प्रक्रियेत ॲड. अनिल निरवडेकर यांचाही मोलाचा सहभाग होता.
रुग्णांची होणारी फरफट थांबणार
गेल्या चार वर्षांत फिजिशियन नसल्यामुळे अनेक गंभीर रुग्णांना गोवा (बांबोळी), जिल्हा रुग्णालय किंवा कोल्हापूर-बेळगाव येथील खाजगी रुग्णालयांत हलवावे लागत होते. उपचाराअभावी काही रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या होत्या. मात्र या नियुक्तीबद्दल संपूर्ण सावंतवाडी तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे.
चौकट
आता डॉ. विशाल शेट्टी यांच्या नियुक्तीमुळे हृदयरोग रुग्णांना स्थानिक पातळीवर तातडीने उपचार मिळतील.क्रिटिकल केअर सुविधेमुळे आपत्कालीन स्थितीत रुग्णांचे प्राण वाचवणे सुलभ होईल.गरीब रुग्णांचा खाजगी रुग्णालयातील मोठा खर्च वाचणार आहे.”सावंतवाडीकरांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या एकजुटीच्या लढ्याला यश आले असून, आता रुग्णांना उपचारासाठी परराज्यात धाव घेण्याची गरज भासणार नाही.” — ॲड. अनिल निरवडेकर (उपनगराध्यक्ष, सावंतवाडी)
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

