🛑ओरोस सेल्स टॅक्स कार्यालयाचा ‘हिशोब’ की ‘हिशेबाच्या नावाखाली वसुली’?
*🛑ओरोस सेल्स टॅक्स कार्यालयाचा ‘हिशोब’ की ‘हिशेबाच्या नावाखाली वसुली’?*
*🛑बार मालक हैराण, अधिकाऱ्यांची‘तोडपाणी’ रंगात!?*
*🛑जी एस टी कार्यालयाकडून ना हरकत दाखल्याचा नवा फंडा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि- २६:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथील सेल्स टॅक्स (GST) कार्यालय सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. कारण काय? तर जिल्ह्यातील बार व्यावसायिकांना अचानक ३ ते ४ वर्षांपूर्वीचे, विशेषतः कोविड काळातील हिशोब काढायला लावले जात आहेत. आणि हे हिशोब ‘क्लिअर’ झाले नाहीत, तर सरळ लायसन्स रिन्यू करायला नाकारलं जातंय, असा गंभीर आरोप बार मालकांकडून होत आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जी एस टी कार्यालयाकडून कोणतीही येणेबाकी नाही त्यामुळे परवाना नुतनीकरण करायला हरकत नाही असा दाखला आणायला सांगतात व येथेच बार मालक अडकतो त्यामुळे दोन खात्यांची ही मिलीभगत आहे असा कोणतेही शासन परीपत्रक नाही असे बार चालकांचे म्हणणे आहे.
कोविडच्या काळात संपूर्ण व्यवसाय ठप्प होता. बार, हॉटेल्स महिनोनमहिने बंद होती. उत्पन्न शून्यावर असताना आज अचानक त्या काळातील कर हिशोब काढून, त्यात तफावत काढून, दंड आणि वसुलीच्या नावाखाली दबाव आणला जातोय, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यावसायिक देत आहेत.
*“हिशोबाच्या नावाखाली थेट सौदेबाजी”*
स्थानिक व्यावसायिकांच्या मते, ही केवळ नियमित तपासणी नसून, तोडपाणी करण्याचा नवा फंडा बनला आहे. फाईल पुढे न्यायची असेल, लायसन्स रिन्यू करायचं असेल, तर ‘सेटलमेंट’ करा, असा थेट किंवा अप्रत्यक्ष संदेश दिला जातोय. काही बार मालकांनी तर उघडपणे सांगितले की,“जुने हिशोब काढून मुद्दाम त्रुटी दाखवतात आणि मग ‘मॅनेज’ करण्याचा सल्ला देतात.”
*प्रशासन झोपेत की संगनमतात?*
सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, हा प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणात सुरु असताना वरिष्ठ अधिकारी गप्प का? हा प्रकार त्यांच्या माहितीशिवाय सुरु आहे का?, की यामागे कुठलं संगनमत आहे? जिल्ह्यातील कर विभागावर आधीही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत, मात्र ठोस कारवाई आजवर झालेली नाही.
व्यवसायिकांमध्ये भीतीचं वातावरण
लायसन्स रिन्यू न झाल्यास बार व्यवसाय बंद पडण्याची वेळ येते. त्यामुळे अनेक जण नाइलाजाने पैसे देऊन प्रकरण मिटवण्याचा मार्ग स्वीकारत आहेत, अशीही चर्चा रंगली आहे. परिणामी, संपूर्ण यंत्रणा ‘भीती आणि दबाव’ यावर चालतेय, असा आरोप होत आहे.
*सरकारच्या महसुलाला धक्का की अधिकाऱ्यांचा फायदा?*
या प्रकारामुळे सरकारचा महसूल खरंच वाढतोय का? की फक्त काही अधिकाऱ्यांचे खिसे भरले जात आहेत? हा देखील मोठा प्रश्न उपस्थित होतोय. जर खरी वसुली होत असेल, तर ती पारदर्शक पद्धतीने का होत नाही?
*तात्काळ चौकशीची मागणी*
या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी,संबंधित अधिकाऱ्यांची संपत्ती तपासली जावी आणि बार व्यावसायिकांना दिलासा मिळावा,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
ओरोसच्या सेल्स टॅक्स कार्यालयात सुरु असलेला हा ‘हिशोब’ नेमका काय सांगतोय?सरकारचा नियम की अधिकाऱ्यांचा ‘नियमबाह्य धंदा’?
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

