🛑आरोंद्यात बेकायदेशीर मायनिंगचा स्फोटक पर्दाफाश;
*🛑आरोंद्यात बेकायदेशीर मायनिंगचा स्फोटक पर्दाफाश;*
*🛑ग्रामपंचायतीची परवानगी नाही,प्रदूषण दाखला नाही!*
*🛑सामाजिक कार्यकर्ते नरेश देऊलकर यांचा आंदोलनाचा इशारा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २६:-* आरोंदा गावातील सर्व्हे नं. २, हिस्सा ६ मधील जमीन खनिज साठवण व कशिंगसाठी भाडेपट्ट्याने देण्यात आल्याचे कागदोपत्री दिसत असले, तरी प्रत्यक्षात या ठिकाणी सुरू असलेले काम पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीची नाहरकत नसताना आणि आवश्यक प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला न घेता सर्रास मायनिंग व उत्खनन सुरू असल्याने प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, याबाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा स्थानिक ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते नरेश देऊलकर यांनी दिला आहे.
*कागदोपत्री करार, पण परवानग्या गायब!*
उपलब्ध दस्तऐवजांनुसार, संबंधित जमीन ही स्थानिक मालकांनी लॉजिस्टिक कंपनीला भाडेपट्ट्याने दिली आहे. करारामध्ये खनिज साठवण व कशिंगसाठी वापर स्पष्ट नमूद आहे. मात्र, ग्रामपंचायतीची अधिकृत परवानगी अद्याप मिळालेली नाही, हेच या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य वाढवणारे आहे.
याहून धक्कादायक म्हणजे, संबंधित मालकाने स्वतः सरपंचांना पत्र देत “नाहरकत दाखला द्यावा” अशी विनंती केली आहे. म्हणजेच, काम सुरू असताना आवश्यक परवानगी घेतलेलीच नाही, हे उघड होते.
*प्रदूषण नियम धाब्यावर!*
खनिज साठवण, कशिंग आणि वाहतूक ही प्रक्रिया पर्यावरणासाठी अत्यंत संवेदनशील असते. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी बंधनकारक असते. मात्र, येथे कोणताही प्रदूषण दाखला नसताना काम सुरू असल्याने स्थानिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
*“आधी उत्खनन, नंतर परवानगी?” – प्रशासन झोपेत!*
स्थानिकांचा आरोप आहे की, “आधी काम सुरू करा, नंतर कागदपत्रे जमवा” हीच पद्धत येथे राबवली जात आहे. मोठ्या प्रमाणात माती व खनिजाची हालचाल सुरू असूनही महसूल, ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणा पूर्णपणे मूकदर्शक बनल्याचे चित्र आहे.
*कायद्याला हरताळ; जबाबदार कोण?*
ग्रामपंचायतीची NOC नाही
प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नाही,उत्खनन मात्र जोमात सुरू या तिन्ही बाबी
स्पष्टपणे.बेकायदेशीरतेकडे निर्देश करतात. मग प्रश्न उरतो — कोणाच्या आशीर्वादाने हा खेळ सुरू आहे?
*स्थानिकांचा इशारा*
आरोंदा ग्रामस्थांमध्ये संताप वाढत असून, “जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारू,” असा इशारा स्थानिक ग्रामस्थ नरेश देऊलकर यांनी दिला आहे.. प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत, तर हा प्रश्न आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
आरोंद्यातील हे प्रकरण केवळ एक भाडेकरार नसून, बेकायदेशीर मायनिंगचा उघड उघड खेळ असल्याचे स्पष्ट होत आहे. कागदोपत्री व्यवहार आणि प्रत्यक्षातील वास्तव यामधील मोठी दरी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करते.आता पाहायचे इतकेच — कारवाई होते की पुन्हा एकदा सर्व काही “मॅनेज” होते?
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

