◾ साने गुरुजी उद्यानात मराठीत पाटी लावा अन्यथा निदर्शने : मनसे चिपळूण
🖥️Kokan Live Braking News
✍️प्रतिनिधी: संतोष पिलके
🎴चिपळूण, दि-१: – शहरातील साने गुरुजी उद्यानात मराठी पाटी लावा अन्यथा लोकार्पण प्रसंगी निदर्शने करण्यात येतील असा इशारा चिपळूण मनसे तर्फे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांना तालुका अध्यक्ष संतोष नलावडे यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्याबरोबर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
चिपळूण शहरामध्ये साने गुरुजी उद्यानाचे सुशोभीकरणाचे काम चालू असून या ठिकाणी इंग्रजी मध्ये त्याची पाटी लावण्यात आलेली आहे ती बदलून मराठीमध्ये लावण्यात यावी अशी मागणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.श्री. वैभव विधाते यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मनसे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याच निवेदनात म्हटले आहे की जर मराठीत फलक लावण्यात आला नाही तर लोकार्पण कार्यक्रमात पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात येतील. यावेळी तालुका अध्यक्ष श्री. संतोष नलावडे, तालुका उपाध्यक्ष अभिनव भुरण, शहर अध्यक्ष मुबीन गोठे , विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अमोल अवेरे, तालुका उपाध्यक्ष गुरुनाथ नागे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष गुरुप्रसाद पाटील, विद्यार्थी सेना शहर कार्याध्यक्ष परेश साळवी, महाराष्ट्र सैनिक सौ. श्रावणी चिपळूणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते