कोकणमहाराष्ट्रसंपादकीयसिंधुदुर्ग

🛑नशेच्या दलदलीत सिंधुदुर्ग…आणि सुशेगाद प्रशासन!

*🛑नशेच्या दलदलीत सिंधुदुर्ग…आणि सुशेगाद प्रशासन!*

 

*🛑आमदार निलेश राणे यांनी अधिवेशनात आवाज उठवला मात्र गेंड्याच्या कातडीचे अधिकारी हप्ते खाऊन सुशेगाद.*

 

*🛑सिंधुदुर्गाच्या विनाशाला कारणीभूत ठरणाऱ्या अधिकाऱ्यांना भर चौकात उभे करुन फटके दिले पाहिजेत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- २३:-* सिंधुदुर्ग… नाव घेतलं की डोळ्यासमोर उभा राहतो निसर्गरम्य किनारा, स्वच्छ हवा, संस्कृतीचा अभिमान आणि शांत जीवनशैली. पण आज या जिल्ह्याची ओळख हळूहळू बदलतेय — आणि ती बदलतेय एका अत्यंत धोकादायक दिशेने. अमली पदार्थ, जुगार, मटका, गोवा बनावटीची विषारी दारू… हे सर्व आता “लपूनछपून” नाही, तर उघडपणे सुरू आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न — हे सर्व सुरू असताना प्रशासन नेमकं करतंय तरी काय?

‌कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी गेल्या काही वर्षांत आणि विशेषतः अलीकडच्या अधिवेशनात ज्या तडफेने, ज्या आक्रमकतेने हा मुद्दा मांडला, तो केवळ राजकीय भाषण नव्हता — तो सिंधुदुर्गच्या जनतेच्या मनातील संतापाचा जाहीर उद्रेक होता. त्यांच्या भाषणांमध्ये वारंवार एकच मुद्दा ठळकपणे समोर येतो — “छोट्या माशांवर कारवाई करून काही होणार नाही, या रॅकेटच्या मुळावर घाव घाला!”ही केवळ घोषणा नाही, तर वास्तवाचे अचूक विश्लेषण आहे.

कारण आज सिंधुदुर्गात जे चाललंय, ते एखाद्या छोट्या गुन्हेगारीचा भाग नाही — ती एक सुसंघटित, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि राजकीय संरक्षण असलेली यंत्रणा आहे. गावोगावी सहज उपलब्ध होणारा गांजा, कॉलेजच्या परिसरात खुलेआम होणारी विक्री, सिगारेटमध्ये मिसळून घेतली जाणारी नशा — हे चित्र पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल.निलेश राणे यांनी अधिवेशनात स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं — “आज सिंधुदुर्गात जे सुरू आहे, ते थांबवण्यासाठी कडकात कडक कारवाई झाली पाहिजे. मोका लावा, कठोर शिक्षा द्या!”

ही मागणी काही अतिरेकी नाही, तर परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव करून देणारी आहे.

पण दुर्दैव असं की, या मागणीचं गांभीर्य प्रशासनाला अजूनही उमजलेलं दिसत नाही.

पोलीस यंत्रणा, राज्य उत्पादन शुल्क विभाग, एलसीबी, सीआयडी — या सर्व यंत्रणा कागदोपत्री अस्तित्वात आहेत, पण प्रत्यक्षात त्या“प्रतिक्रियात्मक” आहेत, “सक्रिय” नाहीत. एखादा लेख प्रसिद्ध झाला, एखादा व्हिडिओ व्हायरल झाला, किंवा लोकांचा संताप उसळला — की लगेच कारवाईचा दिखावा! दहा-वीस ग्रॅम गांजा जप्त, एखादा छोटा विक्रेता अटकेत, आणि दोन दिवसांत सगळं पुन्हा सुरळीत!हा “खेळ” आता जनतेलाही कळायला लागलाय.

मूळ प्रश्न कायम अनुत्तरितच राहतो हा माल येतो कुठून?कोण आणतो?

कोणाच्या संरक्षणाखाली हे रॅकेट चालतं?समुद्रमार्गे होणारी तस्करी ही उघड गुपित आहे. सिंधुदुर्गाचा किनारपट्टी भाग हा या गैरधंद्यांसाठी “सुवर्णमार्ग” बनला आहे. आणि हे सगळं होत असताना किनारपट्टी सुरक्षा, स्थानिक पोलीस आणि इतर यंत्रणा नेमकं काय करत आहेत?

जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी एक वेळा छापा टाकून प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं — “अवैध धंद्यांना जिल्ह्यात थारा नाही!”त्याआधी खासदार नारायण राणे यांनीही जाहीर सभांमधून या प्रवृत्तीवर कठोर टीका केली होती.

म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आहे. नेतृत्व सजग आहे. पण अंमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र ढिम्म!याहून गंभीर बाब म्हणजे — जेव्हा पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते किंवा स्थानिक नागरिक या विरोधात आवाज उठवतात, तेव्हा त्यांनाच धमक्या दिल्या जातात.

चारित्र्यहननाचे प्रयत्न होतात. दबाव आणला जातो.हे कोण करतं?

आणि त्यांना एवढं धाडस येतं कुठून?

याचाच अर्थ स्पष्ट आहे — या गैरधंद्यांच्या मुळाशी केवळ गुन्हेगार नाहीत, तर त्यांना संरक्षण देणारी “छुपी ताकद” आहे.

आमदार निलेश राणे यांनी त्यांच्या भाषणांमध्ये वारंवार एक गोष्ट अधोरेखित केली आहे — “हा प्रश्न केवळ कायद्याचा नाही, हा प्रश्न भावी पिढीचा आहे!”आज सिंधुदुर्गातील तरुणाई ज्या वेगाने नशेकडे वळतेय, ते पाहता ही चिंता अत्यंत रास्त आहे.गावोगावी “टपरी संस्कृती” वाढली आहे, जिथे चहासोबत नशा सहज मिळते.

कॉलेज परिसरात तर ही समस्या अधिक गंभीर आहे.युवक-युवतींच्या हातात सिगारेट नाही, तर नशेचं साधन आहे!हे चित्र थांबवलं नाही, तर उद्या सिंधुदुर्गची ओळख “पर्यटन जिल्हा” म्हणून नाही, तर “नशेचं केंद्र” म्हणून होईल — आणि तो दिवस फार दूर नाही.आज गरज आहे ती “दृढ इच्छाशक्ती” आणि “निर्भीड कारवाई”ची.पोलीस यंत्रणेला केवळ आकडे दाखवून काम भागवता येणार नाही.त्यांना या रॅकेटच्या मुळापर्यंत जावं लागेल.मोठ्या माशांवर कारवाई करावी लागेल.आणि सर्वात महत्त्वाचं — या लढ्यात प्रामाणिकपणा ठेवावा लागेल.

कारण ही लढाई केवळ कायद्याची नाही — ही समाज वाचवण्याची लढाई आहे.आज जर आपण गप्प बसलो, तर उद्या आपल्याच घरातील मुलं या दलदलीत अडकलेली दिसतील.

आणि तेव्हा पश्चात्ताप करून काहीही उपयोग होणार नाही.म्हणूनच हा इशारा आहे — प्रशासनासाठी, पोलीस यंत्रणेसाठी आणि समाजासाठीही.“रात्र वैऱ्याची आहे… आणि ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे!”अमली पदार्थ, विषारी दारू, जुगार-मटका — हे सर्व सिंधुदुर्गातून मुळासकट उखडून टाकलं पाहिजे.आमदार निलेश राणे यांनी उठवललेला आवाज हा केवळ राजकारण नाही — तो जनतेच्या भवितव्याचा लढा आहे.आता प्रश्न एकच —प्रशासन जागं होणार का…

की सिंधुदुर्ग नशेच्या अंधारात कायमचा हरवणार?

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!