▪️गड संवर्धन मोहिमे अंतर्गत ” मनोहर मनसंतोष ” गडावर शौचालय व पाण्याची सुविधा
*▪️गडकरी बांधव, शिरशिंगे-गोठवेवाडी ग्रामस्थ, महिला व बालयुवक मंडळाचा पुढाकार*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*🎴 सावंतवाडी :* तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात वसलेला शिरशिंगे हा गाव. या गावाला लागून असलेल्या शिवापूर येथील ऐतिहासिक गौरवशाली परंपरा असलेल्या शिवकालीन मनोहर मनसंतोष गडावर येणाऱ्या अभ्यासकांसह दुर्गवीर व पर्यटकांच्या सोयीसाठी लोकसहभागातून शौचालय व पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ‘यासाठी मनोहर मनसंतोष गडाचे गडकरी बांधव, शिरशिंगेतील गोठवेवाडी ग्रामस्थ, महिला व बालयुवक मंडळाने पुढाकार घेतला.
वैभवशाली इतिहास असलेल्या गडावर छत्रपती शिवाजी महाराजंचे ३४ दिवस वास्तव्य होते. इंग्रजांना शह देण्यासाठी या गडाचाही वापर करण्यात आला होता. त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या या गडाला विशेष महत्व आहे. त्यामुळे या गडावर येणाऱ्या अभ्यासकांसह दुर्गवीर व पर्यटकांची संख्या वाढतच आहे. या गडावर बारमाही पाणी असलेली विहीर आहे. मात्र, इतर कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत होती.या कामांसाठी कलंबिस्त येथील सातेरी इंजिनियर वर्कसचे कमलाकर सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांचे ही शौचालयाची शेड उभारण्यासाठी सहकार्य लाभले. या शौचालयच्या सुविधेसाठी माडखोल विभागीय शिवसेनेचे सहकार्य लाभले. महिलावर्गाची तर मोठी गैरसोय होते, पर्यायाने या सर्वांची गडावर होणारी गैरसोय लक्षात घेऊन शिरशिंगे गावचे माजी सरपंच सुरेश शिर्के यांच्या संकल्पनेतून या गडावर शौचालयासह पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात, आली आहे.
या गडावर शौचालय बांधण्यासाठी दगड, वाळू, खडी नेण्यासाठी गोठवेवाडीतील घरातून एक माणूस सहभागी झाला होता. त्यात महिला व युवतींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग या गडावर शौचालय व पाणी सुविधा उपलब्ध करण्यासाठी फौजदार वसंत शिर्के, बाळकृष्ण घावरे, सहृदेव शिर्के, सीताराम शिर्के, सुरेश शिर्के, जीवन लाड, सुभाष सुर्वे, संतोष चव्हाण, अनिल कदम, रामकृष्ण घावरे, उत्तम शिर्के, रघुनाथ सुर्वे, राजन घावरे, नाना घावरे, अनिकेत घावरे. रवी शिर्के, शिवसेनेचे विभागप्रमुख पुरुषोत्तम राऊळ, राजेंद्र राऊळ दीपक सांगेलकर संतोष नार्वेकर, उपसरपंच पांडुरंग राऊळ, सुभाष रेमुळकर, भाऊ घावरे, अभी घावरे, वसंत घावरे, सुरेश सार्वत, बाबू परब, दीपक दळवी, नीतेश धावरे आदींसह गडकरी बांधव, गोठवेवाडी ग्रामस्थ, महिला व बालयुवक मंडळाने ही श्रमदानातून सहकार्य केले. यांनी केलेल्या या कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

