◾ चिपळूण नगरपालिका स्त्रिया व बालविकास समितीतर्फे आरोग्य शिबीर उदघाटन संपन्न..

 

◾ रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या शिबिराच्या माध्यमातून साध्य ; सुरेखा खेराडे

🖥️ Kokan Live Braking News

✍️प्रतिनिधी: चिपळूण

🎴चिपळूण,दि-२८:-*  चिपळूण नगर परिषद आणि स्त्रिया व बालविकास समिती यांच्या तर्फे आज रविवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी महिला व लहान मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे उदघाटन नगराध्यक्षा सौ सुरेखाताई खेराडे,उपनगराध्यक्ष सुधीरशेठ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.याप्रसंगी शिवसेना गटनेते समाजकल्याण सभापती उमेश सकपाळ,महिला बालकल्याण सभापती सुरैय्या फकीर,आरोग्य सभापती शशिकांत मोदी,बांधकाम सभापती मनोज शिंदे,नगरसेवक आशिष खातू,नगरसेविका सई चव्हाण,फैरोजा मोडक,शिवानी पवार,सीमा रानडे,संजीवनी शिगवण,सफा गोठे,रश्मी गोखले,स्वाती दांडेकर,सुषमा कासेकर,संजीवनी घेवडेकर,नगरसेवक कबीर काद्री,करामत मिठागरी, परिमल भोसले,माजी नगरसेवक महंमद फकीर आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.यावेळी दिपप्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली तर शिवाजी महाराज यांचा पुतळा ,धन्वंतरी देवतेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे या शिबिराच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे असे नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी उदघाटन प्रसंगी सांगितले.माझ्या कारकिर्दीतील हे नगरपालिके तर्फे सर्वात मोठे शिबीर असल्याचे देखील त्यांनी सांगितले.तर आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांनी सदरचे शिबीर कोरोना कालावधी नंतर भरविलेले अतिशय उपयुक्त शिबीर असून यानंतर या शिबिरातून बोध घेऊन आरोग्य महाशिबिर आयोजित करूया असे आवाहन देखील केले.तसेच महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजित या समितीच्या सभापती सुरैय्या फकीर यांनी सर्व सहकारी नगरसेवक,प्रशासन व वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.यावेळी सई चव्हाण,कबीर काद्री आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी उपस्थित सर्व डॉक्टर्स यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला शहरातील सर्व आशा सेविका उपस्थित होत्या.
चिपळूण नगर परिषदेतर्फे कै.अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकूल येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तज्ज्ञ डॉक्टर पथकांकडून महिला व लहान मुले यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.यावेळी शहरातील अनेक गरजू स्त्रिया आणि लहान मुले यांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरामध्ये एम डी., डी एन बी., एफ ई एस सी इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सचिन लकडे, डी एम बी, डी एन बी इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर राहुल महाडिक, एम बी बी एस, डी एन बी मेडिसीन कन्सल्टंट फिजिशियन डॉक्टर अभय सिंह , कन्सल्टींग पॅथोलॉजिस्ट डॉक्टर राहुल सिंह चड्डा, एमडीएन बी कन्सल्टींग गायनोलॉजिस्ट डॉक्टर सुजय कुलकर्णी, एमडी कन्सल्टंट पेडीटीएशन बालरोगतज्ञ डॉक्टर ए. आर.खोत, एमबीबीएस, एमडी, श्वसन विकार तज्ञ डॉक्टर प्रीतवाज मेथे, एम एस फिजिस एच बीपी ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपी डॉक्टर पराग हवालदार, एम बी बी एस, एम बी पलमनोजी डॉक्टर गौरव रमेश फळे, एस एम बीएस पलमनोजी क्रिटीकल मेडिसिन डॉक्टर आदिती टकले फळे, कॉस्मेटिक लेजर बॉडी स्मिलींग अँड हेअर ट्रान्सप्लांट डॉक्टर पदमेश पाटील, बाल रोग तज्ञ डॉक्टर मतीन शेख, एमबीएस एमडी हृदय रोग तज्ञ डॉक्टर रोहित श्रीवास्तव, प्लास्टिक सर्जन डॉक्टर अमित यादव, इन्फरलिटी डॉक्टर राहुल सांगोलकर आदी डॉक्टर तपासणी करणार आहेत.
सदरच्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मुख्याधिकारी डॉ वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे,खाते प्रमुख राजू खातू,बापू साडविलकर,वैभव निवाते यांनी यशस्वी नियोजन केले होते.आभारप्रदर्शन नगरसेविका सुषमा कासेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!