◾ बायपास-अँजिओप्लास्टी टाळता येणार;३ ते ४ मार्च कालावधीत रत्नागिरी,चिपळूण आणि कोल्हापुरात सुविध..
◾ हृदयविकाराच्या रुग्णांसाठी विशेष उपचार पद्धती…
🖥️ Kokan Live Braking News
✍️प्रतिनिधी: चिपळूण
🎴चिपळूण,दि-२८:- शनिकृपा हार्टकेअर सेंटरच्या माध्यमातून हृदय विकाराच्या रुग्णांसाठी
अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी टाळण्यासाठी विशेष उपचार पद्धती दिली जाणार आहे.यात ईईसीपी, आर्टेरियल क्लिअरन्स थेरेपी,ओझन थेरपी,किलेशन थेरपी,व्हिटॅमिन सी थेरपी आदींचा समावेश आहे.ही सुविधा ३ ते ४ मार्च या कालावधीत चिपळूण,रत्नागिरी व कोल्हापूर येथे उपलब्ध करून देण्यात आली असून यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.दरम्यान या सेवेचा रुग्णांनी लाभ घ्यावा,असे आवाहन शनिकृपा हार्ट केअर सेंटरचे डॉ.जयवंत खवाले व डॉ.अभिजित खवाले-पाटील यांनी केले आहे. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ही सुविधा चिपळूण येथे ३ मार्चला सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० यावेळी ठेवण्यात आली आहे. रत्नागिरी येथे ३ मार्चला दुपारी ३:०० ते ६:०० या वेळेत दिली जाणार आहे. तर कोल्हापूर येथे ४ मार्चला सकाळी १०:०० ते १:०० या वेळेत उपलब्ध असणार आहे.दरम्यान चिपळूण येथे दीपक लॉजच्या मागे भोगाळे येथे,रत्नागिरीत प्रवीण अलूष्टे बंगल्यासमोर साळवी स्टॉप येथे,तर कोल्हापूर येथे व्हीनस कॉर्नर ,जेम्स एम्पायर बिल्डिंग, निर्णय डायग्नोस्टिक शेजारी ,दुसरा मजला डॉ. आसलकर बिल्डिंग येथे हे उपचार दिले जाणार आहेत.याचा रुग्णांनी लाभ घ्यावा,तसेच अधिक माहितीसाठी ९६८९००८०८१/ ९९६०३१६३१८ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन शनिकृपा हार्ट केअर सेंटरच्या माध्यमातून करण्यात आले आहे.