कणकवली काँलेज येथे कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणुन साजरा
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. २८ कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील शेक्सपिअर म्हणुन ओळखले जातात. त्यांच्या ’नटसम्राट’ या नाटकाने मराठी साहित्यात एक वेगळा ठसा उमटविला. या नाटकातील स्वगते व संवाद वाचकाला प्रेरित करतात. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्र चौगुले यांनी केले.
कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली काँलेज कणकवली येथे वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणुन साजरा करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ. चौगुले बोलत होते. प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा. डॉ. लालासाहेब घोरपडे, प्रा. मंगलदास कांबळे, प्रा. सीमा हडकर, प्रा. विनिता ढोके उपस्थित होते.
प्रा. डॉ. घोरपडे यांनी कुसुमाग्रजांच्या सम्रग साहित्याचा आढावा घेतला. मराठी भाषा बोलण्यास सोपी असली तरी आकलनास कठीण आहे. त्यामुळे कोणी आपणास वेडे ठरविण्यापेक्षा रोजच्या वापरतील भाषा वापरावी, असे मत व्यक्त केले. प्रा. कांबळे यांनी मराठी भाषा ही गौरवशाली भाषा असल्याचे सांगुन मराठी साहित्यातील साहित्यिकांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. प्रा. सीमा हडकर यांनी आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही मराठी भाषेने आपले अस्तित्व टिकवुन ठेवले आहे. संगणकातही युनिकोडच्या माध्यमातुन मराठी भाषा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावरून मराठी भाषेचा दर्जा सिद्ध होतो. असे मत व्यक्त केले.
प्रा. स्नेहा वंजारे यांनी मराठी भाषा दिनाचे महत्व विशद केले. तर प्रा. डॉ. अनिल फराकटे यांनी स्वरचित व मराठीतील नामवंत कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितेचे सादरीकरण केले. प्रा. डॉ. मारूती चव्हाण यांच्यासह विद्यार्थी समता तावडे, दीपक लाड, सायली धुरी, अमेय हिर्लेकर, सुजय जाधव, निना बांदेकर यांनी कविता सादर केल्या. प्रास्ताविकात प्रा. विजय सावंत यांनी मराठी साहित्याचा समग्रपणे आढावा घेतला. सुत्रसंचालन मृणाल गांवकर, तर आभार प्रा. माधुरी राणे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

