कोकणदेवगडमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑वानिवडे-पावणाई कातळ शिल्पांचे गाव…

*🛑वानिवडे-पावणाई कातळ शिल्पांचे गाव…*

 

*🛑सरवणकरवाडीचा २५० वर्षांची परंपरा जपणारा शिमगोत्सव.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- ०४:-* कोकण म्हटलं की दोन सण प्रत्येक मालवणी माणसाच्या हृदयात घर करून बसलेले असतात—गणपती आणि शिमगोत्सव! शिमगा म्हणजे केवळ होळी नव्हे, तर परंपरा, इतिहास, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक वारसा यांचा अनमोल संगम. देवगड तालुक्यातील वानिवडे-पावणाई कातळ शिल्पांसाठी प्रसिद्ध असलेल्या गावातील सरवणकरवाडीचा शिमगोत्सव ही अशाच जिवंत परंपरेची साक्ष देणारी ओळख आहे.

गाबीत समाजाचा ऐतिहासिक वारसा

देवगड तालुक्यातील गाबीत समाजाचा शिमगोत्सव हा केवळ धार्मिक विधी नसून त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. विजयदुर्ग किल्ला येथे आरमारात देवगड परिसरातील अनेक गाबीत कुटुंबे स्वराज्याची सेवा करत होती. सरवणकर घराण्याचे पूर्वजही या आरमारात वतनदार म्हणून कार्यरत होते.

मराठा आरमाराचे शिल्पकार सरखेल कान्होजी आंग्रे आणि त्यानंतर संभाजी आंग्रे यांच्या काळात विजयदुर्गचा दरारा संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पसरला होता. इ.स. १७३८ साली इंग्रजांवर मिळवलेल्या विजयाची गाथा आजही अभिमानाने सांगितली जाते. संभाजी आंग्रे यांच्या स्मृती जागविण्यासाठी आणि समाजातील एकजूट टिकवण्यासाठी गाबीत समाजाने शिग्मोत्सवाची परंपरा सुरू केली, अशी ऐतिहासिक नोंद सांगितली जाते.

रामेश्वर मंदिर, विजयदुर्ग परिसरातील समाधीस्थळाशीही या परंपरेचा संदर्भ जोडला जातो. कोळीण नृत्याद्वारे स्वामीनिष्ठा व्यक्त करण्याची पद्धत तेव्हापासून रूढ झाली आणि आज अडीचशे वर्षांहून अधिक काळ ती अखंड सुरू आहे.

घुमाट, फाग आणि कोळीण – परंपरेचा आत्मा आहे

*घुमाट*

मातीच्या मडक्यासारख्या आकाराच्या भांड्याच्या एका बाजूस घोरपडीचे चामडे ताणून बसवलेले हे खास तालवाद्य फक्त शिमग्यासाठी वापरले जाते. घुमाटाची कडकडीत थाप पडली की गावाच्या माळावर उत्सवाचा आत्मा जागा होतो.

*फाग*

घुमाटाच्या विशिष्ट लयीत गायली जाणारी पौराणिक, पारंपरिक गीते म्हणजे फाग. रामायणातील प्रसंगांवर आधारित फाग आजही तितक्याच जोशात सादर होतात—

“रावणान सीता नेलीया वरी, हनुमंत पाठविले कुंवरी हो…”

अशा ओळींनी रात्र भारलेली असते.

*कोळीण नृत्य*

कुमारवयीन मुलगा स्त्रीवेष धारण करून पाच रात्री पहाटेपर्यंत घुमाट-फागाच्या तालावर नृत्य सादर करतो. अर्जुनाच्या बृहन्नडा रूपाशी साधर्म्य दाखवणारी ही परंपरा सामाजिक समरसतेचे प्रतीक मानली जाते.

*होळीची रात्र: परंपरेचा विधी*

होळीच्या आधी टेहळणी करून ठेवलेले शेवर, आंबा किंवा पोफळीचे झाड मध्यरात्री मिरवत माळावर आणले जाते. आदल्या वर्षीचा खुंट काढून नव्या झाडाची विधीपूर्वक स्थापना होते. आंब्याच्या फांद्यांनी सजवून, हळदीत भिजवलेला पांढरा कापड झेंड्यासारखा बांधला जातो.

होळदेवाची पूजा, नैवेद्य, पालापाचोळा पेटवून होळी प्रज्वलित करणे आणि त्यानंतर सुरू होणारा फाग-कोळीण नाच—ही सगळी प्रक्रिया गावाच्या एकोप्याचे प्रतीक ठरते.

*सोंगे आणि सामाजिक भाष्य*

फागांमध्ये विश्रांती म्हणून रंगणारी “सोंगे” म्हणजे गावातील व आजूबाजूच्या घडामोडींवर विनोदी भाष्य करणारी लघुनाट्ये. आजच्या भाषेत ‘स्किट’ म्हणता येईल अशी ही सादरीकरणे समाजप्रबोधनाची भूमिकाही बजावतात.

*धुळवड आणि वाडेचार*

पाचव्या दिवशी धुळवडीच्या पहाटे “वाडेचार” विधी होतो. घराण्याचा देव अंगात येणे, किसना-राधा रूपातील सादरीकरण, गुलाल उधळण—हीच खरी रंगपंचमी! नवस फेडणे, कौल घेणे आणि शेवटी तळी करून आरतीने कार्यक्रमाची सांगता होते.

यानंतर वाडवळ व सत्यनारायण महापूजा होऊन शिमगोत्सवाची औपचारिक समाप्ती होते.

परंपरा जपणारी गावे

देवगड तालुक्यातील देवगड मळई, आनंदवाडी, गिर्ये बांदेवाडी, विजयदुर्ग, तळवडे, तारामुंबरी, आंबेरी, मोंड, विरवाडी, कट्टा, मोर्वे, आडबंदर, वडप, जैतापूर आणि वानिवडे-सरवणकरवाडी येथे आजही हा शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होतो.

तरुणांचा सहभाग काही ठिकाणी कमी झाला असला तरी वानिवडे सरवणकरवाडीमध्ये ही परंपरा आजही तेवढ्याच जोशात आणि अभिमानाने जपली जाते.

सामाजिक एकीचे जिवंत प्रतीक

शिमगोत्सव म्हणजे केवळ सण नाही

*ती इतिहासाची आठवण* स्वामीनिष्ठेची परंपरा, समाजातील एकोपा आणि सांस्कृतिक ओळखीचा उत्सव आहे. वानिवडे-पावणाई कातळ शिल्पांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भूमीत शिमगा हा वारसा जपण्याची जबाबदारी प्रत्येक पिढीने उचलली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!