कोकणमहाराष्ट्रसंपादकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कोकणचा आवाज पुन्हा एखदा विधानसभेत दुमदुमला—आमदार निलेश राणे यांची आक्रमक भूमिका.

*🛑कोकणचा आवाज पुन्हा एखदा विधानसभेत दुमदुमला—आमदार निलेश राणे यांची आक्रमक भूमिका.*

 

*🛑विधानसभेतील २८८ आमदारांमध्ये प्रभावी मुद्दे मांडून उठून दिसणारा आमदार निलेश राणे.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०४:-* कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांनी विधिमंडळात मांडलेले मुद्दे हे केवळ राजकीय भाषण नव्हते; ते कोकणाच्या जखमांवरचे थेट बोट होते. जिल्हा नियोजन निधीपासून काजू उत्पादकांच्या प्रश्नांपर्यंत, गोहत्या, वृक्षतोड, ड्रग्स आणि बनावट दारूच्या वाढत्या साखळीपर्यंत — त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे जनतेच्या रोजच्या जगण्याशी निगडित आहेत.

निधी वाटपात भूगोल नव्हे, गरज हवी“जिल्हा लहान आहे म्हणून निधी कमी” — ही सरधोपट भूमिका कोकणासारख्या डोंगर-दऱ्यांत विखुरलेल्या जिल्ह्यांवर अन्याय करणारी आहे. सिंधुदुर्ग नकाशावर छोटा दिसतो; पण वस्तुस्थिती अशी की गावे पसरलेली, वाड्या डोंगरमाथ्यावर, पायाभूत सुविधा खर्चिक. अशा परिस्थितीत केवळ क्षेत्रफळावर निधी ठरवणे म्हणजे प्रशासनाची आळशी सोय!व कोकण वर अन्याय करणारी आहे असा थेट हल्ला सरकारवर केला.

राणे यांनी १०,४८२ कोटींच्या पुरवणी मागण्यांवर चर्चेविना निर्णय होतो, याकडे लक्ष वेधले. हा प्रश्न केवळ आकड्यांचा नाही; तो पारदर्शकतेचा आहे. आमदार निधी ५ कोटींचा; पण वर्षाअखेरीस ४.५ कोटीही खर्च होत नाहीत, ही प्रशासकीय अनागोंदी नाही का? खर्च क्षमतेचे कारण देत जिल्ह्यांना निधी रोखणे म्हणजे विकास रोखणेच.जर लहान जिल्ह्यांना किमान ५०० कोटी आणि मोठ्यांना १,००० कोटींचा न्याय्य फॉर्म्युला लागू झाला, तर तो विकासाचा किमान पाया ठरेल असे प्रभावी पणे मा़डले.

*काजू उत्पादकांची वेदना — आयात धोरणाचा फटका*

कोकणातील काजू उत्पादकांच्या प्रश्नावर राणे यांनी घेतलेली भूमिका ही केवळ राजकीय नाही, तर आर्थिक अस्तित्वाची लढाई आहे. एकेकाळी १८% असलेले आयात शुल्क २.५% वर आणल्याने आफ्रिकन काजू बाजारात ओसंडून वाहतो आहे. स्थानिक काजू त्यात मिसळला जातो आणि स्थानिक काजू बदनाम होतो जी आय मानांकन असलेला कोकणतला विशेष तहा सिंधुदुर्गातील काजू अखेरची घटका मोजत आहे काजू चे दर कोसळतात.शेजारच्या गोवा राज्यात काजू बीला १७० रुपये प्रतिकिलो हमीभाव मिळतो, मग महाराष्ट्रात का नाही? हवामान बदल, उत्पादन खर्च, बाजारातील स्पर्धा — या सगळ्यात शेतकरी कोंडीत सापडला आहे. आयात शुल्क किमान २०% वाढवण्याची मागणी ही भावनिक नव्हे, तर तर्कशुद्ध आहे.

*पर्यावरण, गोहत्या आणि वाढता अंमली सापळा*

“झाडे लावा” म्हणणारेच जंगल साफ करण्यास परवानगी देतात, ही दुटप्पी भूमिका थांबली पाहिजे.सिंधुदुर्गातील वृक्षतोड केवळ पर्यावरणाचा नव्हे, तर पर्यटन आणि शेतीचा घात आहे.

गोहत्या, ड्रग्स आणि बनावट दारू या मुद्द्यांवर कठोर कारवाईची मागणी करताना राणे यांनी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीचा मुद्दा उपस्थित केला. कायदे आहेत; पण त्यांची अंमलबजावणी कोठे अडकते? प्रशासनातील ढिलाई आणि स्थानिक पातळीवरील संगनमत या प्रश्नांना सामोरे जाण्याची तयारी सरकार दाखवणार का? असा थेट सवाल केला.

निलेश राणे यांची आक्रमक शैली अनेकांना रुचते, अनेकांना टोचते. पण एक गोष्ट स्पष्ट आहे — त्यांनी मुद्दे मांडले. आता प्रश्न असा की सरकार केवळ उत्तर देईल की निर्णय घेईल?कोकणातील जनता भाषणांचा गजर ऐकून थकली आहे. तिला हमीभाव हवा, रस्ते हवेत, सुरक्षितता हवी आणि पारदर्शक निधी हवा.जर हे मुद्दे केवळ सभागृहापुरते राहिले, तर ते राजकारण ठरेल.पण त्यातून ठोस निर्णय झाले, तर ते खरे

लोकप्रतिनिधित्व ठरेल.आणि आमदार निलेश राणे हे सर्व सरकारकडून करून घेतील याचा विश्वास आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!