कणकवलीकोकणशैक्षणिकसिंधुदुर्ग

कनेडी ज्युनिअर कॉलेज आयोजित दोन दिवसीय बेसिक रोबोटीक्स निर्मिती

🖥️Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. २७ वायरलेस रोबोट, मोबाईल फोन कंट्रोल रोबोट, ब्रेन कंट्रोल रोबोट अशा प्रकारच्या रोबोटचे प्रात्यक्षिक अनुभवतानाच वायरद्वारे चालणारा रोबोट प्रत्यक्ष तयार करण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. रोबोटकरिता लागणार्‍या साहित्याची व त्याकरिता संपुर्ण प्रक्रिया याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रोबोट तयार केला. आपण तयार केलेला रोबोट चालतोय याचा आनंद सहभागी विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर ओसंडुन वाहत होता. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व ज्यु. कॉलेज येथे आयोजित दोन दिवसीय बेसिक रोबोटीक्स निर्मिती कार्यशाळेचे, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ऑटोमेशन या अमेरीकेतील आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या आशिया पॅसिफिक विद्यार्थी समितीचे अध्यक्ष. तसेच कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे विद्यमान संचालक प्रा. दत्तात्रय उर्फ सागर सावंत व नरसी मोनजी विद्यापीठ मुंबई येथील प्रा.निर्मल ठाकुर हे मार्गदर्शक म्हणुन लाभले होते. इ. ९ वी, विज्ञान शाखेतील ११ वी, १२ तील १०० विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. संपुर्ण जिल्ह्यात अशा आगळ्यावेगळ्या कार्यशाळेचे आयोजन करण्याचा मान माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेने मिळवला.

संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. संस्था खजिनदार प्रकाश सावंत उपस्थित होते. रोबोट अर्थात यंत्रमानव हा लहानथोरांपासुन सगळ्यांचाच कुतुहलाचा विषय असतो. खेळण्यातील रोबोटपासून ते कारखान्यातील रोबोटपर्यंत तो मानवाच्या वापरात आहे. रोबोटचे लहान मुलांना आकर्षण असते. हे लक्षात घेऊन या रोबोटिक्स निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रोबोट कसा बनतो आणि कसा कार्य करतो. याचे विद्यार्थ्यांमध्ये असणारे औत्सुक्य ओळखुन विद्यार्थी सृजनशील व्हावेत, या उदात्त हेतुने प्रा. दत्तात्रय उर्फ सागर सुर्यकांत सावंत यांनी पुढाकार घेऊन सदर कार्यशाळेचे आयोजन केले होते.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!