🛑तळवणे येथील मंजूर रस्ता दोन वर्षे प्रतीक्षेतच.
*🛑तळवणे येथील मंजूर रस्ता दोन वर्षे प्रतीक्षेतच.*
*🛑संबंधित विभाग व ठेकेदाराच्या रस्त्याबाबत उदासीनतेमुळे रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत.*
*🛑मात्र अर्धवट रस्त्याच्या कामामुळे येथील ग्रामस्थांना सहन करावा लागतोय त्रास.*
*🛑येथील ग्रामस्थांचे सहकार्य असूनसुद्धा रस्त्याचे काम करण्यास टाळाटाळ.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथील मुख्य रस्ता ते झंजीरवाडी रस्ता (४०० मीटर) दोन वर्ष होत आली तरी अपूर्णावस्थेत असून,याबाबत संबंधित विभाग व ठेकेदार या कामाबाबत उदासीन असल्याचे दिसून येते.तसेच या पुढील वाडी ही भटवाडी असून येथील ग्रामस्थांना सुद्धा या अर्धवट स्थितीत असलेल्या कामामुळे प्रवास करणे धोक्याचे असून, एखादी दुर्घटना घडली तरच या विभागाला जाग येणार काय?असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
एकीकडे शासन ग्रामीण भागातील रस्ते सुस्थितीत करण्यासाठी विविध येजनामार्फत प्रयत्न करत असून,मात्र तळवणे येथील संबंधित रस्ता हा मंजूर असूनही खडीकरण डांबरीकरण होण्याच्या प्रतीक्षेतच आहे.गेले दोन वर्ष सदरील झंजीरवाडी ग्रामीण मार्ग क्रमांक ३५६ या ४०० मीटर रस्त्याच्या कामाबाबत मंजुरी मिळाली होती.सदरचे काम ठेकेदार यांना देऊनही या रस्त्याचे काम अधांतरीतच असल्याचे दिसून येत आहे.
या कामांबाबत वारंवार येथील लोक प्रतिनिधी , ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना,ठेकेदारांना विचारणा केली.मात्र आज करतो,उद्या करतो हेच उत्तर त्यांच्या कडून मिळत असल्याने येथील ग्रामस्थ आक्रमक होताना दिसताहेत.सदरील रस्त्यावरून भटवाडीतील व,स्थानिक ग्रामस्थ रात्री बेरात्री कामानिमित्त ये जा करत असतात त्यात करून एखादा प्रसंग ओढवला तर या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जिगरीचेच असल्याने हा प्रवास करणे खडतरच आहे.
संबंधित ठेकेदाराने अर्धवट स्थितीत हे काम करून ठेवल्याने येथील ग्रामस्थांना प्रवास करणे म्हणजे डोक्याला तापच असून,बांधकाम विभागाने हे प्रलंबित असलेले अर्धवट काम लवकरात लवकर सुरू करून लोकांना होणारा त्रास कमी करावा अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे,जर हे काम लवकरात लवकर सुरू नाही केल्यास ग्रामस्थ आक्रमक होत रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले.त्यात करून आता पावसाळा जवळ येत असून ,हे खडीकरण डांबरीकरणाचे काम लवकरात लवकर करावे.अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
या रस्त्याच्या कामाबाबत येथील ग्रामस्थ,जमीन मालक सहकार्य करून सुद्धा सदरील काम सुरू होण्यास दोन वर्ष कालावधी लागतो आणि हे काम पूर्णपणे अर्धवट स्थितीत ठेवण्याचे कारण गुलदस्त्यातच असल्याचे दिसून येते.
मात्र संबंधित काम हे आज होईल,उद्या होईल या आशेवर येथील ग्रामस्थांनी सहन केलं. या नंतर मात्र गप्प बसणार नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितलं.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

