कणकवलीकोकणशासकीयसिंधुदुर्ग

ऑनलाईन रिझर्व्हेशन केंद्र खारेपाटण बसस्थानकात सुरू करण्यात यावे

◼️खारेपाटण – बोरिवली स्लीपर सीटर गाडी कायमस्वरूपी सुरू करण्यात यावी

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

खारेपाटण : दि. २७ कणकवली तालुक्यातील खारेपाटण या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अतिशय महत्वाचे असलेल्या खारेपाटण बस स्थानक येथुन स्वतंत्र मुंबईला जाणारी कोणतीही बस नसल्यामुळे, तसेच ऑनलाइन तिकीट आरक्षण खिडकी नसल्यामुळे. दशक्रोशीतील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता, खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतीच परिवहन मंत्री अनिल परब यांची खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी भेट घेऊन त्यांना मागणीचे लेखी निवेदन दिले आहे.

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. यावेळी कणकवली येथे खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत आणि खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते महेश कोळसुलकर यांनी मंत्री अनिल परब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी मागणीचे निवेदन दिले.

खारेपाटण येथुन मुंबईला जाणारी खारेपाटण – मुंबई ही एस. टी. गाडी दशक्रोशीतील नागरिकांकरिता सुरु होती. मात्र २५ वर्षांपुर्वी एका मोठ्या अपघातानंतर ही गाडी कायमची बंद करण्यात आली.

आज बसस्थानक नव्याने बांधल्यानंतर सुद्धा देखील या स्थानकातुन मुंबईला जाणारी स्वतंत्र अशी कोणतीच गाडी नसल्यामुळे, येथील दशक्रोशीतील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पर्यायाने नागरिक आणि प्रवासी खाजगी वाहनाने, तसेच रेल्वेने मुंबईला जाणे पसंत करीत आहे. म्हणुन खारेपाटण बस स्थानकातुन खारेपाटण – बोरिवली स्लीपर व सीटर गाडी कायमस्वरूपी सुरू करण्यात यावी, अशी मागणी खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.

तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुंबईला व बोरिवली येथे जाणाऱ्या सर्व एस. टी. गाड्यांचे ऑनलाईन रिझर्व्हेशन केंद्र खारेपाटण बसस्थानकात सुरू करण्यात यावे. अशी देखील मागणी या लेखी निवेदनात करण्यात आली आहे.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!