हेत किंजळीचा माळ येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :संजय शेळके
🎴ठिकाण-वैभववाडी
विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हभप ज्ञानेश्वर महाराज रासकर आळंदी यांच्या उपस्थितीत दिंडी सोहळा
विस्थापित आखवणे, हेत किंजळीचा माळ येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सप्ताहानिमित्त आठ दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंडप प्रवेश, स्वस्ति वाचन, पुण्याहवाचन, सर्व पीठ स्थापना, श्रींचा जलाधिवास, होमहवन, श्रींचा धान्याधिवास, श्रींचा महास्नान विधी, श्रींचा शय्याधिवास, श्रींचा अभिषेक स्नान विधी, होम हवन, प्राणप्रतिष्ठा, न्यास, महानैवेद्य, पूर्णाहूती आरती आदी कार्यक्रम पार पडले. त्याचबरोबर अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त रोज सकाळी पहाटे काकड आरती, नित्यनेम सांप्रदायिक भजन, प्रवचन, हरिपाठ व हरिकीर्तन असे कार्यक्रम पार पडले. या अखंड हरिनाम सप्ताहला मुंबई, आळंदीहून कीर्तनकार उपस्थित झाले होते.
कीर्तनकार व प्रवचनकार म्हणून हभप.प्रमोद महाराज कुलकर्णी मुंबई, हभप. अनंत महाराज मोरे मौंदे, हभप. चंद्रकांत महाराज गारगोटे आळंदी, हभप. रमेश महाराज गोरे आळंदी, मारुती महाराज भालेकर भोम, हभप. दीपक महाराज पाठक मुंबई, हभप. ज्ञानेश्वर महाराज रासकर रामायणाचार्य आळंदी यांनी किर्तनरुपी सेवा बजावली. काल्याचे किर्तन हभप श्री ज्ञानेश्वर महाराज रासकर यांनी केले. दरम्यान पार पडलेल्या दिंडी सोहळ्याला मोठ्या संख्येने वारकरी भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.
३६ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धाकुबाई देवी प्रासादिक वारकरी सांप्रदाय भजन मंडळ मुंबई व आखवणे वरचीवाडी स्थानिक ग्रामस्थ मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. वै. हभप दत्ताराम महाराज कोलते, वै. राजाराम पुतळाजी नागप, वै. हभप दत्ताराम पुतळाजी नागप, वै. गुरुवर्य हभप श्रीधर महाराज नागप यांच्या कृपाशीर्वादाने व वारकरी सांप्रदाय मारवाडीवाडी मुंबई यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडले.
सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

