कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑विजेच्या विनाकारण लपंडावाने ग्राहक हैराण !

*🛑विजेच्या विनाकारण लपंडावाने ग्राहक हैराण !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २४:-* पाऊस,वारा,विजेचा कडकडाट नसताना वीज वारंवार गुल होण्याचे प्रमाण सावंतवाडी शहराबरोबरच ग्रामीण भागातही वाढले आहे. गेले आठ दिवस सातत्याने विजेचा लपंडाव सुरूच आहे. यामुळे व्यापारी, शासकीय कार्यालये, खासगी कार्यालयांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता अनेक कामे संगणकावर ऑनलाईन प्रक्रियेने होतात. वीज वारंवार गुल होण्याच्या प्रकारामुळे कामे वेळेत होत नाहीत. मोबाईल रिचार्ज, ऑनलाईन व्यवहार ही सर्व कामे विस्कळीत होत आहेत. त्यामुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी झाडांच्या फांद्या वीजवाहिनींना लागून लाईट शॉट होणे असे प्रकार होत असल्याचे सांगितले. परंतु, सध्या वारा नसताना फांद्या, पाने वीजवाहिनीला कशा लागतात, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

सिंधुदुर्गात झाडांना तारा लागून वीज जाण्याचे प्रकार होत असतील, तर त्यावर कुठलीच उपाययोजना नाही का? वीज वितरण विभाग नेमके करतो तरी काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या वीज वितरण विभागाकडे लोकप्रतिनिधी, पालकमंत्री खासदार यांचे लक्ष नाही. पावसाळ्याचे दिवस आणि गणेश चतुर्थी आली की ही राजकीय मंडळी वीज वितरणकडे लक्ष देतात. त्यामुळेच वीज वितरणचे अधिकारी-कर्मचारी बिनधास्तपणे राहतात,असे लोकांमधून बोलले जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, विशेषतः सह्याद्रीपट्ट्यातील जिथून ११ केव्ही लाईन दुर्गम डोंगराळ भागांतून येते, तेथील झाडे तोडणे आवश्यक आहे. हे काम खरे तर, मार्च-एप्रिलमध्येच होणे आवश्यक आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!