कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑फोंडाघाट परिसरातून एकाच रात्री दोन दुचाकी लंपास.

*🛑फोंडाघाट परिसरातून एकाच रात्री दोन दुचाकी लंपास.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २४:-* तालुक्यातील फोंडाघाट परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन दुचाकी चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.याप्रकरणी दोन्ही दुचाकी मालकांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोंडाघाट-मारुतीवाडी येथील रहिवासी महादेव सूर्यकांत भोगटे (४७) यांनी आपली एचएफ डिलक्स (एमएच०७ एएल ६८२४) ही दुचाकी २० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता नेहमीप्रमाणे घरासमोरील पार्किंगमध्ये उभी केली होती. रात्री ११.३० वाजेपर्यंत गाडी तिथेच असल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले होते. मात्र,२१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांना आपली दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. या गाडीची किंमत अंदाजे ३० हजार रुपये आहे,असे फिर्यादीत म्हटले आहे.

दुसरी चोरी फोंडाघाट-गांगोवाडी येथील ‘हॉटेल अथर्व’च्या पार्किंगमध्ये घडली.हॉटेल मालकांनी त्यांची काळ्या रंगाची होंडा शाइन (एमएच ०७ झेड ७१६०) ही दुचाकी २० फेब्रुवारी रोजी रात्री ११ वा.च्या सुमारास पार्किंगमध्ये लावली होती. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वा.ही चोरी उघडकीस आली. हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, २१ फेब्रुवारी रोजी पहाटे २.१५ वा.च्या सुमारास दोन अज्ञात इसम ही दुचाकी चोरून नेताना दिसत आहेत. रात्रीची वेळ असल्याने चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चोरीमुळे वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!