🛑बांदा-काळसेवाडी परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी.
*🛑बांदा-काळसेवाडी परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि- २४:-* येथील काळसेवाडी परिसरात भर दुपारी एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवा उद्योजक सिद्धेश शिरोडकर यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी ही धाडसी घरफोडी केली. विशेष म्हणजे, शिरोडकर यांचे घर मुख्य हमरस्त्याला लागून असूनही चोरट्यांनी दिवसाढवळ्या हे कृत्य केल्याने परिसरात भीतीचे आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरोडकर यांच्या घरातील देवाच्या गाभाऱ्यातील भांडी व किरकोळ साहित्य चोरीला गेले आहे. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल न केल्याने बांदा पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नाही.
सोमवारी बांद्याचा आठवडा बाजार असल्याने शहरात मोठी वर्दळ होती. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी शिरोडकर यांच्या बंद घराला लक्ष्य केले.सिद्धेश शिरोडकर यांचे बांदा बाजारपेठेत कपड्याचे दुकान असून,दुपारी नेहमीप्रमाणे ते जेवणासाठी घरी आले असता त्यांना मुख्य दरवाज्याची कडी आणि कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. घरात प्रवेश केल्यावर सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले पाहून घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

