कोकणमहाराष्ट्रसंपादकीयसिंधुदुर्ग

🛑पैशाच्या पावसात लोकशाहीचा बुडता सूर्य — सिंधुदुर्गात ‘अदृश्य कुबेर’चा कहर!

*🛑पैशाच्या पावसात लोकशाहीचा बुडता सूर्य — सिंधुदुर्गात ‘अदृश्य कुबेर’चा कहर!*

 

*🛑पैशाने सर्वच विकत घेता येते हा गोड गैरसमज दूर करणे काळाची गरज.*

 

*🛑ज्या दिवशी स्वाभिमान जागा होईल,त्या दिवशी पैशाच्या पावसात भिजलेले हे खोटे साम्राज्य एका क्षणात कोसळेल.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- २३:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अलीकडील जिल्हा परिषद निवडणुकांनी एक कटू वास्तव उघड केले आहे. मतदारसंघात विचार, तत्त्व, कार्यकर्त्यांची निष्ठा, जनसंपर्क, वक्तृत्व, जनतेसाठी केलेले काम — हे सगळे मागे पडले; पुढे राहिला तो फक्त पैसा! गावोगावी, घराघरांत पैशांची पाकिटे पोहोचली. कुठे पाच हजार, कुठे दहा हजार, तर कुठे एका घरात पन्नास हजार ते एक लाखांपर्यंत रक्कम वाटली गेली. आणि या पैशाच्या पावसात अनेक नवखे, अपरिचित चेहरे निवडून आले. हा केवळ निवडणुकीचा निकाल नाही; हा लोकशाहीच्या गळचेपीचा थरारक अध्याय आहे.

एकेकाळी “मतदार राजा” म्हणून ओळखला जाणारा नागरिक आज मतासाठी भीक स्वीकारणारा बनवला गेला आहे. मत मागताना नम्रतेचे, विकासाचे, समाजकारणाचे गोड शब्द; आणि पाठीमागे पैशांची पाकिटे. काही ठिकाणी तर त्या पाकिटात देवतांचे फोटो, अंगारा, नारळाला हात लावून शपथ — भावनिकतेचा अजब खेळ! देवाच्या साक्षीने पैसे स्वीकारा आणि मत द्या, अशी अघोरी मानसिकता तयार केली गेली. धर्म, अध्यात्म, श्रद्धा — सगळे काही पैशाच्या बाजारात विकले गेले.

कोकण ही साधू-संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अध्यात्म, प्रामाणिकपणा, निष्ठा यांची परंपरा असलेली ही भूमी आज पैशाच्या मोहात अडकली, ही शोकांतिका आहे. भगवंताच्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हलत नाही, असे आपण मानतो. पण त्याच श्रद्धेचा वापर करून मतदारांना भावनिक गुलाम बनवण्याचा प्रकार पाहायला मिळाला. देवाचा अंगारा घालून पैसे देणे — हा श्रद्धेचा अपमान नाही का?जिल्ह्यात “अदृश्य कुबेर” नावाची एक प्रवृत्ती डोके वर काढताना दिसते. कोण आहेत हे कुबेर? त्यांचा पैसा कुठून येतो? एका मतदारसंघात एवढी कोट्यवधींची उधळण करण्यामागे कोणते व्यवहार आहेत? किंवा या जिल्ह्यात कोणाला तरी कमी करून आपले बस्तान बसविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे हा पडलेला एक प्रश्न आहे.

हा पैसा जनतेच्या सेवेतून आलेला नाही; तो कुठल्या तरी पिळवणुकीतून, कुठल्या तरी मोठ्या व्यवहारातून, कुठल्या तरी अदृश्य हातातून आलेला आहे, हे उघड आहे. आणि या पैशाच्या बळावर निवडणुका जिंकल्या जात असतील, तर

प्रामाणिक कार्यकर्त्यांनी राजकारणात उभे राहायचे कशासाठी?पूर्वी सभा गाजवणारा नेता, लोकांची मने जिंकणारा कार्यकर्ता, जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारा प्रतिनिधी — तोच निवडून येत असे. आता समीकरण बदलले आहे. ज्याच्याकडे पैसा जास्त, जो मतांची किंमत जास्त लावतो, त्याच्याकडे कल. घरात चार मते असतील तर दोन एका उमेदवाराला, दोन दुसऱ्याला — म्हणजे पैशाची विभागणी. ही लोकशाहीची थट्टा नाही का?

एक अभंग ओळ आठवते — “पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला मणिहार.” जे तत्त्वनिष्ठ, जे प्रामाणिक, जे समाजासाठी झटणारे — त्यांना निराशा; आणि जे पैशाच्या जोरावर मैदानात उतरतात, त्यांना विजयाचा मणिहार! हे चित्र चिंताजनक आहे. जर हा ट्रेंड कायम राहिला, तर उद्या विरोधात उभे राहण्याची हिंमत कोणी करणार नाही. कारण पैशाच्या पावसापुढे विचारांचे, तत्त्वांचे छत्र धरून किती वेळ उभे राहता येईल?

परंतु या सगळ्याला पूर्णविराम देण्याची ताकद कुणाकडे आहे? ती आहे मतदाराकडे! अदृश्य कुबेर कितीही हातांचा असो, त्याला नामोहरम करण्याची ताकद मतदाराच्या एका बटनात आहे. पैसे घ्या — कारण ते तुमचेच आहेत. ते कुणाच्या तरी पिळवणुकीतून, कुणाच्या तरी इमान विकून आलेले आहेत. पण मत देताना विवेक वापरा. पैसे देणाऱ्याला पराभूत करा. त्या दिवशी त्यांना कळेल की इमान पैशाने विकत घेतले जात नाही.

काही जण म्हणतील, हे नैतिक आहे का? पण महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले — “सत्यासाठी कधी कधी युक्ती आवश्यक असते.” समाज परिवर्तनासाठी जर एखाद्या चुकीच्या प्रवृत्तीला धडा शिकवायचा असेल, तर मतदाराने बुद्धीने खेळ करायला हवा. देव कोणावर कोप करणार नाही, जर तुम्ही पैशाच्या मोहाला बळी न पडता योग्य उमेदवाराला मत दिले तर.

कारण चार वर्षांनी पुन्हा निवडणूक येईल. आज मिळालेले पाच-दहा हजार रुपये चार वर्षे पुरणार आहेत का? त्या पैशामुळे तुम्ही त्यांचे गुलाम होणार आहात का? उद्या कामासाठी गेल्यावर तुम्हाला नैतिक अधिकार उरणार आहे का प्रश्न विचारण्याचा? “आम्ही तुम्हाला पैसे दिले” — एवढे एक वाक्य तुमचे तोंड बंद करण्यासाठी पुरेसे ठरेल. मग विकासाची मागणी कशी करणार?

आज सिंधुदुर्गात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती धोक्याची घंटा आहे. पैशाच्या लग्नात नीतिमत्ता, लोकशाही, तत्त्व, विचार — सगळे हरवत चालले आहेत. हा कल रोखला नाही, तर पुढील सर्व निवडणुका धनिकांच्या ताब्यात जातील. सामान्य, प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्यांचे राजकारणातून नामोनिशाण मिटेल.

ही वेळ आहे जागृतीची. मतदाराने स्वतःला भिकारी समजणे थांबवावे. मत हा व्यवहार नाही; तो अधिकार आहे. तो पवित्र आहे. देव, धर्म, श्रद्धा यांच्या नावाने होणाऱ्या या बाजारबुडव्यांना धडा शिकवणे हीच खरी लोकसेवा आहे. अन्यथा उद्या आपण आपल्या मुलांना सांगू शकणार नाही की लोकशाही म्हणजे काय.सिंधुदुर्गच्या मातीत अद्यापही सज्जनता जिवंत आहे. त्या सज्जनतेला पैशाच्या चकाकीत हरवू देऊ नका. अदृश्य कुबेराचा अहंकार मोडायचा असेल, तर मतदाराने जागे व्हावे लागेल. पैशाचा पाऊस थांबवायचा असेल, तर मताचा प्रहार करावा लागेल.कारण शेवटी — सत्ता पैशाने विकत घेता येते, पण जनतेचा स्वाभिमान नाही. आणि ज्या दिवशी हा स्वाभिमान जागा होईल, त्या दिवशी पैशाच्या पावसात भिजलेले हे खोटे साम्राज्य एका क्षणात कोसळेल — एवढे मात्र निश्चित!

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!