कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑बार्टीतर्फे आरटीईचे फॉर्म भरण्याची विनामूल्य सोय.

*🛑बार्टीतर्फे आरटीईचे फॉर्म भरण्याची विनामूल्य सोय.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- २०:-* मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत आरटीई दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना स्वयंअर्थ सहाय्यशाळा, विनाअनुदानित शाळांसाठी १७ फेब्रुवारीपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी १० मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था बार्टीतर्फे आरटीईचे फॉर्म विनामूल्य भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आरटीईअंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक, एचआयव्ही बाधित किंवा प्रभावीत बालक, अनाथ बालके, दिव्यांग बालके अथवा कोविड प्रभावित बालकांचा वंचित घटकात, तर आर्थिक वर्षात पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असलेल्या बालकांचा आर्थिक दुर्बल घटकांमध्ये समावेश होतो. पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून एक किमी पेक्षा कमी अंतरावरील शाळा आरटीई संकेतस्थळावर दिसतील.

त्यामधील शाळांची निवड करावी. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रं अपलोड करणे आवश्यक आहे.

सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टीतर्फे विद्यार्थ्यांचे ऑ नलाईन फॉर्म मोफत भरण्याची सोय करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांचे फॉर्म विनामूल्य भरण्यात येणार आहेत. ज्या पालकांना आरटीई प्रवेशाचे फॉर्म विनामूल्य भरायचे आहेत, त्यांनी तालुक्यातील समतादुतांशी संपर्क साधावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विभागप्रमुख डॉ.बबन जोगदंड, विभागीय प्रकल्प अधिकारी तेजस्विनी सोनवणे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संग्राम कासले, ९४२०८२४८७४ यांच्याशी संपर्क साधावा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!