दहावी, बारावी बोर्डाचे अंतिम वेळापत्रक जाहीर..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर
🎴राजापुर : दि. २७ राज्यातील कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र, राज्य मंडळाकडून १६ फेब्रुवारीला जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकावर मागवण्यात आलेल्या सूचनांनतर शुक्रवारी दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे, तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे एप्रिल – मे २०२१ मध्ये घेण्यात येणार्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक १६ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले होते.
राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या या संभाव्य वेळापत्रकावर संघटना, शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षण तज्ज्ञांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार आलेल्या सूचनांचे अवलोकन करून राज्य मंडळाने शुक्रवारी दहावी व बारावीचे संभाव्य वेळापत्रकच अंतिम केल्याचे जाहीर केले. त्यानुसार अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी जाहीर केले.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

