सावंतवाडी येथे अथायु मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल आणि जिवनरक्षा प्रतिष्ठान आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा शुभारंभ
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी : दि. २७ शहरात एकाच ठिकाणी मल्टीस्पेशलिटी हाॅस्पीटलच्या डॉक्टरांना आणून मोफत आरोग्य शिबीर आयोजित करून जीवनरक्षा प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसुरकर यांनी जनसेवेचे केलेले कार्य कौस्तुकास्पद आहे. तसेच तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रूग्णांची सेवा केली पाहिजे, असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेम सावंत भोसले यांनी केले. गोरगरीब जनतेला आरोग्य शिबिरासारखी मोफत सुविधा उपलब्ध करून, जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर कोल्हापूर येथील अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सहकार्यही लाखमोलाचे असल्याचे गौरवोद्गार सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले यांनी काढले.
सावंतवाडी काझी शहाबुद्दीन सभागृहात
अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर आणि जीवनरक्षा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने पिवळ्या व केसरी शिधापत्रिकाधारकांना आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ आज सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेम सावंत-भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राणी श्रीमंत शुभदादेवी भोसले, जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजु मसुरकर, कोल्हापूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सौरभ गांधी,डॉ. बसवराज कलगडे,डॉ.राहुल पाटील,डॉ.रघुनाथ नाईक,डाॅ.श्रीकांत नाईक,डाॅ.सिध्दगौडा आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्वांचे श्री मसुरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, गेली कित्येक वर्ष जीवन रक्षा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण अडलेल्या नडलेल्या गरीब श्रीमंत अशा सर्वच जनतेला आरोग्याच्या दृष्टीने सहकार्य करत आलो, कुठल्याही व्यक्ती संदर्भात समस्या निर्माण झाल्यास तसेच उपचारासाठी योग्य मार्गदर्शन हवे असल्यास आपण यासाठी नेहमी काम केले आहे राजीव गांधी जीवनदायी आणि आता महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून बऱ्याच रुग्णांना लाभ मिळवून दिला आहे मोठमोठ्या खर्चाच्या शस्त्रक्रियाही आपण या योजनेच्या माध्यमातून मोफत करून घेतले आहेत वेळोवेळी आपण या संदर्भात जनतेला आवाहनही केले आहे
राजू मसुरकर म्हणाले, सावंतवाडी राजघराण्याच्या राजमाता कै. सत्वशिलादेवी भोसले आणि श्रीमंत खेम सावंत भोसले यांच्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जीवनदायी आरोग्य योजना आणि गोवा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोवा येथे आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
आजच्या ठिकाणी अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल,कोल्हापूर यांच्या मदतीने पिवळे व केशरी शिधापत्रिका धारकांना मोफत आरोग्य शिबिर आपण घेत आहोत जेणेकरून या आरोग्य शिबिराचा लाभ अनेकांना व्हावा आणि त्यांच्या समस्या मार्गी लागाव्यात हाच यामागचा हेतू आहे, शिबिरामध्ये हृदयरोग तज्ञ अस्थिरोग तज्ञ तसेच विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टर उपलब्ध असून योग्य मार्गदर्शन आणि उपचार या ठिकाणी केले जाणार आहे, असे श्री. मसुरकर म्हणाले.
अथायु मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर मदन गांधी म्हणाले, राजू मसुरकर यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असून वेळोवेळी ते विविध आजारावरील रुग्णांच्या सेवेसाठी स्वतः मेहनत घेत असतात नेहमी त्यांचा आमच्याशी संपर्क असतो.
या शिबिरात एकूण ६१ लोकांची नावनोंदणी झाली असून यात आर्थो, मणका व मेंदू विकार, मूत्रविकार, ह्रदयविकार, कॅन्सर, आदी आजारांवरील ओपीडी कन्सल्टेशन घेण्यासाठी लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी उपस्थिती दर्शवत राजू मसुरकर यांना शुभेच्छा दिल्या.
🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥
🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️
🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️
🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे रसीक लाॅंड्री..
⚡संर्पक : अमीत राऊळ
📱मोबाईल : ९६५७०९०९२७
📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७
💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥
🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥
💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण..
🏬आमचा पत्ता :
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
⚡प्रो.प्रा. अरुण गावडे
📱मोबाईल : ८२७५०३७४०८
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला