कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगाव येथील ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी शिवजन्मोत्सव ऐतिहासिक वातावरणात उत्साहात संपन्न.

*🛑मळगाव येथील ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी शिवजन्मोत्सव ऐतिहासिक वातावरणात उत्साहात संपन्न.*

 

*🛑शिवकालीन दुर्मिळ व निवडक प्रतिकृतींच्या भव्य प्रदर्शनाला शिवप्रेमींची गर्दी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-* मळगाव–रस्तावाडी येथील शिवभक्त ज्ञानेश्वर गोविंद राणे यांच्या निवासस्थानी शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत ऐतिहासिक व प्रेरणादायी वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.

या उपक्रमाचे यंदाचे सलग आठवे वर्ष असून, शिवकालीन इतिहासाचे संवर्धन व पुढील पिढीपर्यंत तो प्रभावीपणे पोहोचावा या संकल्पनेतून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे.

शिवजयंती निमित्त खास राणे यांच्या संकल्पनेतून शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. सकाळपासूनच या प्रदर्शनास सुरुवात झाली असून हे प्रदर्शन रात्री १० वाजेपर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये शिवकालीन इतिहासाचे विविध पैलू जिवंत करणाऱ्या निवडक व दुर्मिळ प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. मराठा आरमाराच्या सामर्थ्याचे दर्शन घडविणाऱ्या मराठा आरमारातील तब्बल आठ जहाजांच्या प्रतिकृती, तसेच जहाजांवर वापरण्यात येणाऱ्या तोफांच्या प्रतिकृती हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले.

मराठ्यांच्या शस्त्रागारातील प्रमुख शस्त्र असलेली मराठा धोप, मावळ्यांच्या शौर्याचे प्रतीक असलेली वर्क धोप, तसेच शिवइतिहासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण असलेल्या अफजलखान वधप्रसंगी वापरण्यात आलेल्या वाघनखे व कट्यार यांच्या प्रतिकृतींनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. यासोबतच, मराठा आरमार ग्रंथातील २२ ऐतिहासिक छायाचित्रांचे प्रदर्शन, पावनखिंडीत पराक्रम गाजवून बलिदान दिलेल्या बाजीप्रभू देशपांडे यांची ऐतिहासिक वंशावळ व दांडपट्टा, शिवकालीन संदर्भ ग्रंथ, मराठा शस्त्रागारातील उर्मी व दांडपट्टा यांसारखी शस्त्रे अभ्यासकांसाठी विशेष ठरली.

प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अस्सल पेहराव दर्शविणारी दुर्मिळ छायाचित्रे, ऐतिहासिक शिक्क्यांचे मजकूर, गोमंतकीय भागातील दुर्गांची माहिती, छत्रपती संभाजी महाराज यांचे हस्ताक्षर, मनुची संग्रहातील शिवाजी महाराजांची छायाचित्रे, तसेच ऐतिहासिक नाण्यांचे विशेष प्रदर्शनही मांडण्यात आले होते.

याशिवाय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२ किल्ले व दुर्गांची छायाचित्रे पाहून इतिहासप्रेमींना कोकणातील दुर्गवैभवाची सखोल ओळख झाली. संपूर्ण प्रदर्शनामुळे उपस्थितांना शिवकालीन इतिहास केवळ वाचण्याऐवजी प्रत्यक्ष अनुभवण्याची दुर्मिळ संधी मिळाली. राणे यांनी शिवजयंतीनिमित्त मांडलेले हे प्रदर्शन केवळ एक प्रदर्शन नसून एक दिवसाचे शिवअभ्यास पर्व असल्याचे मत अनेकांनी व्यक्त करत तरुण पिढीला शिवविचारांची प्रेरणा मिळत असल्याचेही अनेकांनी यावेळी सांगितले. शिवभक्त ज्ञानेश्वर राणे यांनी राबविलेल्या या यां उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. राणे यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील ७१ जिल्हा परिषद शाळांमध्ये भेट देत या सर्व ऐतिहासिक वस्तूंची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली असून, त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव व प्रेरणा मिळावी यासाठी मार्गदर्शन केले आहे. यापुढेही अशाच प्रकारचे ऐतिहासिक, शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रम सातत्याने राबवले जातील, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दिवसभरात मळगावसह पंचक्रोशीतील शिवभक्त, इतिहासप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून प्रदर्शनाचा लाभ घेतला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!