कोकणदेवगडमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑कुणकेश्वर यात्रोत्सवापूर्वी प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्याचे आदेश.

*🛑कुणकेश्वर यात्रोत्सवापूर्वी प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्याचे आदेश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- १२:-* कुणकेश्वर यात्रा नियोजनाच्या बैठकीत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी ज्या-ज्या विभागाला या परिसरातील विकासकामे करण्याबाबत सूचना केल्या आहेत,त्या सर्व कामांबाबत तातडीने कार्यवाही करावी. प्रत्येक विभागाने जबाबदारी यशस्वीपणे व योग्य प्रकारे सांभाळावीत,अशा सूचना प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिल्या.

कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सभागृहात मंगळवारी प्रांताधिकारी कातकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभा झाली. यावेळी तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, सचिव हेमंत वातकर, खजिनदार उदय पेडणेकर, संजय वासुदेव वाळके, दीपक घाडी, मंगेश पेडणेकर, कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती सुप्रिया बंगडे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण आदी उपस्थित होते. तसेच ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य विविध शासकीय विभागाचे अधिकारीवर्ग उपस्थित होते. कुणकेश्वर यात्रा नियोजन सभा यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या दालनात पालकमंत्री नीतेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. या सभेत जी कामे सुचविण्यात आली होती, त्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. सर्व विभागांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे सांभाळून यात्रा सुरळीत पार पाडावी, अशा सूचना प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला दिल्या. यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी यात्रोत्सव नियोजनाची माहिती एकनाथ तेली यांच्याकडून घेत कामाची पाहणी केली. त्यानंतर सर्व विभागांचा आढावा घेतला. पार्किंग व्यवस्था, आरोग्य सेवा, अग्निशमन व्यवस्था, बस वाहतूक, पोलीस सुरक्षा यांची माहिती घेऊन त्यांना सूचना केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने कुणकेश्वर मंदिराकडे येणाऱ्या मिठमुंबरी बागवाडी रस्त्यावर यात्रा कालावधीत धूळ उडू नये, म्हणून पाणी मारण्याच्या सूचना देण्यात आल्या. यात्रोत्सवात सीसीटीव्ही कॅमेरे सर्वत्र बसविण्यात यावेत. व्हीआयपी प्रवेश साठी ओळखपत्र व त्याची आगाऊ माहिती पोलिसांना द्यावी,अशी मागणी पोलिसांनी केली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!