वैभववाडी पंचायत समिती उपसभापती पदासाठी अरविंद राणे यांची बिनविरोध निवड*
*▪️भाजप पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष साजरा*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*संजय शेळके*
*🎴वैभववाडी :*
वैभववाडी पंचायत समिती उपसभापती पदासाठी अरविंद भास्कर रावराणे यांचा बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. या उपसभापती पदाच्या निवडणूकीसाठी भाजपचे अरविंद रावराणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार रामदास झळके यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यांची निवड जाहीर होताच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्याची अतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.
यावेळी वैभववाडी मंडळ अध्यक्ष नासीर काझी, वीत्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, पंचायत समिती सभापती अक्षता डाफळे, माजी उपसभापती दुर्वा खानविलकर, भाजपा जिल्हा सदस्य राजेंद्र राणे, पं.स.सदस्य हर्षदा हरयाण, बाळा हरयाण, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राजू पवार, भारती रावराणे, विद्या पाटील, शुभांगी पवार, प्राची तावडे, प्रकाश सावंत, संताजी रावराणे, किशोर दळवी, महेश रावराणे, प्रकाश शेलार, बंधू वळंजू, संजय सावंत, रज्जब रमदुल, रमेश पवार, सचिन तळेकर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_*🚗इन्शुरन्स काढायचा आहे.. “Don’t Worry”*_
*🌈आता आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढा अगदी आपल्या खिशाला परवडेल अशा पैशात..🚗*
*🛵आमच्याकडे सर्व गाड्यांचे फुल इन्शुरन्स,थर्ड पार्टी इन्शुरन्स काढून मिळतील..*
*🚗तुमच्या खिशाला परवडतील अशा विविध रक्कमेच्या इन्शुरन्स पाँलिसी उपलब्ध..*
_*🤷🏻♂️ संपर्क : विशाल पित्रे, सावंतवाडी*_
_*📱मोबाईल : 9405475712*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

