कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑जिल्हा पोलीस अधीक्षक दहिकर यांना ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर.

*🛑जिल्हा पोलीस अधीक्षक दहिकर यांना ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- २६:-* सन २००२ मध्ये उपअधीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झालेले सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर यांनी आपल्या दीर्घ,निष्ठावान आणि कर्तृत्ववान सेवेद्वारे पोलीस दलात वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यांच्या उत्कृष्ट सेवेची दखल घेत केंद्र सरकारकडून त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

डॉ.दहिकर यांनी सेवेच्या प्रारंभी वरोरा आणि नागपूर (ग्रामीण) उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करताना शिस्त,पारदर्शकता आणि प्रभावी कामगिरीने ठसा उमटविला.अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदावर जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून कार्यरत असताना त्यांच्या समर्पित नेतृत्व व सर्वांगीण प्रशासनामुळे या केंद्राला ‘आयएसओ प्रमाणपत्र’ प्राप्त झाले. ही त्यांच्या कार्यक्षमतेची ठळक पावती ठरली. मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त वाहतूक, झोन १० व झोन ११ येथे कार्यरत असताना गुन्हे अन्वेषण, अंडरवर्ल्डमधील फरारी आरोपींचे प्रत्यार्पण, कायदा व सुव्यवस्था तसेच व्हीआयपी दौऱ्याचे नियोजन यासारख्या अत्यंत जबाबदारीच्या कामकाजात त्यांनी उल्लेखनीय यश मिळविले.मुंबई एटीएसमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी अनेक दहशतवादी गटांचा पर्दाफाश करून राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी दिली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!