कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी शहरातील नळ पाईपलाईनचे काम निकृष्ट !

*🛑सावंतवाडी शहरातील नळ पाईपलाईनचे काम निकृष्ट !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २६:-* सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा,न्यू खासकीलवाडा ते जेलनजीकच्या सर्व परिसरात नगरपालिकेकडून सुरू असलेले नळयोजना पाइपलाईन घालण्याचे काम निकृष्ट पद्धती तसेच धीम्या गतीने सुरू असून यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सर्व प्रभागात खोदाई करून ठेवण्यात आल्याने रात्रीच्या वेळी अपघातासारखे प्रसंग उद्भवू शकतात.त्यामुळे तातडीने हे काम पूर्ण करावे. अन्यथा प्रशासनाला घेराव घालत जाब विचारला जाईल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांनी दिला आहे. सावंतवाडी शहरात सगळीकडे रस्ते खोदाई करून नवीन पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या खोदाईमुळे शहरात ठिकठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले आहे. खासकीलवाडा, न्यू खासकीलवाडा जेलनजीकचा संपूर्ण भाग धुळीने माखला आहे. या भागात सध्या खोदाईचे काम जोरात सुरू असून यामुळे खासकीलवाडा परिसरात धूळ पसरली आहे. ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे त्रास उद्भवू लागले आहेत. पाईपलाईन टाकण्यासाठी जी यंत्रणा वापरली जाते,ती निकृष्ट पद्धतीची आहे. अधिकारी, अभियंत्यांनी हे काम सुरू असताना प्रत्यक्ष साईटवर असणे गरजेचे असताना कोणीही अधिकारी या ठिकाणी फिरकत नाही.त्यामुळे नागरिकांना यांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.रस्ते खोदाईसाठी खासकीलवाडा परिसरातील रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. एक भाग खोदाईसाठी घ्यावा. तेवढाच भाग वाहतुकीस बंद ठेवावा,अशी सूचना सुभेदार यांनी केली आहे.शहरात निकृष्ट पद्धतीने पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर काम तातडीने पूर्ण करून डांबरीकरण करावे. धुळीच्या त्रासातून नागरिकांना मुक्त करावे.अन्यथा प्रशासनाला ठाकरे शिवसेनेतर्फे घेराव घालण्यात येईल,असा इशारा सुभेदार यांनी दिला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!