🛑 देवसू प्राथमिक शाळेमध्ये तृणधान्यांपासून साकारली भारत माता…*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत.*
*🎴सावंतवाडी, दि-२६ :-*
77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा देवसु येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांची तयारी मागील बऱ्याच दिवसांपासून शाळेमध्ये घेण्यात येत होती, त्यातलाच एक प्रकार म्हणजे तृणधान्यांपासून साकारलेली भारतमाता . शाळेतील पदवीधर शिक्षिका सौ प्रणिता मांडवकर यांच्या संकल्पनेतून भारताचा नकाशा काढून त्यामध्ये तृणधान्य पेरून भारत माता साकारण्यात आली, हे आजच्या दिवसाचे खास आकर्षण होते. त्याचबरोबर शाळेमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम देखील घेण्यात आले. जसे देशभक्तीपर गाण्यावर लेझीम नृत्य ,सध्या गाजत असलेला मराठी चित्रपट क्रांतीज्योती मराठी माध्यम मधील सुप्रसिद्ध गीत “स्वर्गात आकाशगंगा” या गाण्यावर थाळी कवायत व विद्यार्थ्यांचे विविध मानवी मनोऱ्यांचे संगीतमय प्रदर्शन. यामध्ये सर्वच विद्यार्थी इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे सहभागी करण्यात आले होते, मुलींनी देखील सुंदर असे मनोरे साकारलेले होते शाळेतील सहाय्यक शिक्षक श्री राऊळ सर, सौ मांडवकर मॅडम व अमिषा राऊळ मॅडम व मुख्याध्यापक श्री प्रवीण ठाकूर सर यांचे यासाठी सहकार्य लाभले. सर्व पालक, ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून त्यांचे खूप खूप कौतुक करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाला गावचे प्रथम नागरिक म्हणजे सरपंच श्री सावंत ,ग्रामपंचायत सर्व सदस्य, पोलीस पाटील प्रवीण सावंत, तसेच वाशी क्राईम शाखेचे एसपी माननीय श्री विश्वास पवार साहेब शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विजय मेस्त्री व इतर पालक व ग्रामस्थ हे देखील उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_
*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*
*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*
*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*
*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*
*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*
*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*
*कसे वापरावे ?*
*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*
*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*
*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*
*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*
*संपर्कासाठी*
*9423254613*
*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*
*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

