कोकणमहाराष्ट्ररत्नागिरी

🛑२० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोकणला न्याय : अनिकेत वालावलकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश.

*🛑२० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोकणला न्याय : अनिकेत वालावलकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश.*

 

*🛑रत्नागिरीत GDCA व CHM परीक्षा केंद्र मंजूर – कोकणच्या तरुणांसाठी ऐतिहासिक टप्पा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴रत्नागिरी, दि- २०:-* कोकणातील तरुणांना गेली दोन दशके भेडसावणाऱ्या एका मोठ्या अन्यायावर अखेर फुंकर बसली आहे. सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या GDCA (General Diploma in Cooperative Accounting) आणि CHM (Cooperative & Horticulture Management) परीक्षा केंद्रांना रत्नागिरी जिल्ह्यात मान्यता मिळाली असून, मे २०२६ पासून या परीक्षा कोकणातच होणार आहेत.

हा निर्णय केवळ प्रशासकीय परिपत्रक नसून, तो कोकणच्या सातत्यपूर्ण संघर्षाचा, चिकाटीचा आणि इच्छाशक्तीचा विजय आहे. या ऐतिहासिक यशामागे स्वावलंबी भारत अभियान – कोकण प्रांत समन्वयक अनिकेत रवींद्र वालावलकर यांचा दोन दशकांचा अखंड पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.

मुंबई–कोल्हापूरची वणवण थांबणार रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी आतापर्यंत या परीक्षांसाठी मुंबई किंवा कोल्हापूरला जाण्यास मजबूर होते. आर्थिक खर्च, मुक्कामाची गैरसोय, प्रवासातील अडचणी आणि अनोळखी शहरातील मानसिक ताण — हा सगळा त्रास केवळ परीक्षा देण्यासाठी सहन करावा लागत होता.

हा त्रास फक्त शारीरिक नव्हता, तर तो कोकणच्या तरुणांच्या

आत्मसन्मानालाही धक्का देणारा होता.

*२० वर्षांचा संघर्ष, पण ध्येय अढळ*

२००५ साली बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी पहिल्यांदा हा मुद्दा मांडला. त्यानंतर अनिकेत वालावलकर यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून, नंतर सहकार भारतीचे जिल्हा संपर्क प्रमुख, आणि आज स्वावलंबी भारत अभियानचे कोकण प्रांत समन्वयक म्हणून — निवेदनं, तक्रारी, पाठपुरावा कधीही थांबू दिला नाही.

किती सहकार मंत्री बदलले, किती आयुक्त निवृत्त झाले, सरकारे आली-गेली; पण ध्येय मात्र बदलले नाही.अखेर पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालयातून आलेल्या एका फोनने दोन दशकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला.

*राजकीय पद नव्हे, इच्छाशक्ती महत्त्वाची*

या यशाबाबत बोलताना वालावलकर म्हणतात,“धोरणे राबवण्यासाठी राजकीय पदच लागते असे नाही. इच्छाशक्ती आणि सातत्य असेल तर बदल घडतो.”हे यश केवळ एका परीक्षा केंद्राचे नसून, कोकणातील भावी सहकार लेखापाल,व्यवस्थापक आणि स्वावलंबी पिढीच्या उभारणीचा पाया आहे.

कोकणसाठी अजूनही लढाई सुरूच

GDCA–CHM केंद्रानंतरही कोकणसाठी अनेक धोरणात्मक लढे प्रलंबित आहेत.

सहकारी व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र,फलोत्पादन आधारित सहकारी प्रक्रिया उद्योगांना विशेष दर्जा,कोकणासाठी स्वतंत्र सहकार लेखापरीक्षण कार्यालय —अशा अनेक विषयांवर विविध संघटनांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असल्याचे वालावलकर यांनी स्पष्ट केले.“राजकीय वरदहस्त नसेल, आर्थिक बळ नसेल; पण संघटनांचा पाठिंबा असेल तर भीती कशाची?”

असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*कोकण जिंकलं!*

GDCA आणि CHM परीक्षा केंद्र रत्नागिरीत मंजूर होणे हा कोकणच्या सहकार क्षेत्रातील मैलाचा दगड ठरत असून, या ऐतिहासिक निर्णयासाठी अनिकेत रवींद्र वालावलकर यांचे योगदान उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे.आज अनेकांना कोकणातच परीक्षा देता येणार आहेत —हा विजय केवळ व्यवस्थेवर नाही, तर उपेक्षेवर मिळवलेला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!